शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:कितीही प्रतिभा असली तरी आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी मेहनती बरोबरच वेळप्रसंगी संघर्षही करावाच लागतो.शिरूर मध्ये शिक्षण घेतलेले आजचे आघाडीचे संगीतकार अजय अतुल याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.असे प्रतिपादन शिरूर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार यांनी केले.
झी सारेगामापा संगीत स्पर्धेची २०१७ ची नॅशनल विनर अंजली गायकवाड व विविध संगीत शो मध्ये नैपुण्य मिळवलेली नंदिता गायकवाड या भगिनी तसेच या दोघींचे वडील व संगीत गुरू पंडित अंगद गायकवाड यांच्याशी येथे झालेल्या भेटीवेळी ॲड.पवार यांनी उपरोक्त विधान केले.त्यांनी अंजलीच्या संगीत प्रवासाबद्दल माहिती घेतली.अंजली ही सध्या पुणे येथील भारती विद्यापीठात बी ए संगीत या विषयात प्रथम वर्षात शिक्षण घेत असून नंदिनी याच विषयात तृतीय वर्षाला आहे.अंजली व नंदिनी यांची खूप मोठी स्वप्ने आहेत.संगीत क्षेत्रात त्यांना नाव कमवायचे आहे.सध्या त्या शिक्षणा बरोबरच महाराष्ट्रभर संगीत कार्यक्रम करीत आहेत.अंजली व नंदिनी या दोघींमध्ये प्रचंड प्रतिभा आहे.ॲड.पवार यांनी या भगीनींचे कौतुक करताना प्रतिभा असली तरी यशाचे शिखर गाठण्यासाठी मेहनत व संघर्ष करा असा सल्ला दिला.याबाबत पवार यांनी अजय अतुल यांचा दाखला दिला.अजय अतुल यांनी शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत शालेय शिक्षण घेतले.या शाळेतच संगीत शिक्षक शिवानंद मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी संगीताची बाराखडी गिरवली.यानंतर त्यांनी पुण्यात व नंतर मुंबई असा संगीत प्रवास केला.या प्रवासात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.आज बॉलीवूड मधील यशस्वी संगीतकारांपैकी एक अशी अजय अतुल यांची ओळख आहे.प्रस्थापित यशस्वी संगीतकारांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.या संघर्षातूनच आज त्यांनी यशाचे शिखर गाठले.
अंजली व नंदिनी या भगीनीं मध्येहीअजय अतुल यांच्याप्रमाणे प्रतिभा आहे.मात्र ज्या संघर्षातून या बंधूंनी संगीत क्षेत्रात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.या दोघींनी याचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करावी.असा मौलिक सल्ला ॲड.पवार यांनी दिला.दोघींनीही याला सकारात्मक प्रतिसाद देताना हा सल्ला आम्हाला जीवनात मार्गदर्शक ठरेल.असे वक्तव्य केले.उज्वला गायकवाड, मानवी गायकवाड यावेळी उपस्थित होते.