शिरूर:उपेक्षित वंचित घटकांसाठी झटणाऱ्या वात्सल्यसिंधू फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेविका अंजली थोरात यांनी केले.अशा संस्थांना समाजाने मदतीचा हात दिला पाहिजे.अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या चिमुकल्यांना शालेय साहित्य,टिफिन बॉक्स व खाऊवाटप करण्यात आले. यावेळी थोरात बोलत होत्या.मदारी वस्ती,ऊसतोड तसेच वीटभट्टी मजूर,त्यांची मुले,शाळाबाह्य मुले आदींसह समाजातील विविध स्तरातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी वात्सल्यसिंधू फाउंडेशन कार्य करीत आहे. त्यांचे हे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे थोरात म्हणाल्या. अशा संस्था निरपेक्षपणे काम करत असतात.त्यामुळे समाजाने त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे.अशी अपेक्षा थोरात यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे (बाळासाहेब ठाकरे गट) शहर प्रमुख मयूर थोरात, वैद्यकीय कक्ष तालुकाप्रमुख सुरेश गाडेकर,वात्सल्यसिंधू फाउंडेशनच्या अध्यक्षउ सुनंदा लंघे,सचिव उषा वाखारे, सामाजिक कार्यकर्ते विजय लंघे, शिवसेना उपशहर प्रमुख भरत जोशी, महिला शहर प्रमुख रेश्मा श्रीरसागर,शुभम माळी,यश दरेकर,अतुल राऊत, निवृत्त मुख्याध्यापिका गोदावरी गायकवाड,लोळगे आदी यावेळी उपस्थित होते.