शिरूर:भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उन्नत भारत अभियान योजेनेंतर्गत येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालाच्या वतीने तालुक्यातील पाच गावे दत्तक घेण्यात आल्याची माहिती प्राचार्य डाॅ. के.सी.मोहिते यांनी दिली.
सरदवाडी, कर्डेलवाडी, अण्णापूर, निमगाव म्हाळुंगी आणि भांबर्डे हि पाच गावे दत्तक घेण्यात आली असून या पाच ग्रामपंचायतीच्य ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये या अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. या गांवांमधिल ग्रामस्थ व इच्छुक विद्यार्थी, युवक यांना या योजनेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.महाविद्यालायच्या विद्यार्थ्यांकडून या गावांचा सर्वे करण्यात येणार असून, गावातील प्रमुख तीन समस्या मनुष्य बळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहेत व त्या प्रमुख समस्यावर केंद्र सरकारकडून या गांवांमध्ये योजना राबविण्यात येणार असल्याचे डॉ. मोहिते यांनी सांगीतले.दरम्यान महाविद्यालयाच्या वतीने निवड करण्यात आलेल्या गांवांचे सरपंच विलास कर्डिले, राजेंद्र दसगुडे, दत्तात्रय कुरुंदळे,ज्योती शिर्के, लक्ष्मीबाई रासकर यांना या योजनेची माहिती देण्यात असून निवडीच्या आशयाची पत्रे देऊन त्यांचे अभिनंदनही करण्यात आले आहेेे. या योजनेतंर्गत कोरोना जनजागृती, स्वयंरोजगार, वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, तसेच प्रबोधनात्मक व्याख्याने आदि कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार असल्याचे शि.शि.प्र मंडळाचे सहसचिव नंदकुमार निकम यांनी सांगीतले.महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचेेे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.सुरज सावंत हे उन्नत भारत अभियान या योजनेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.