…..तर कारखानदारांच्या परताव्यात कपात करणार-उद्योगमंत्री देसाई

स्थानिकांना रोजगार नाकारणाऱ्या कारखानदारांना इशारा

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: स्थानिक तरुणांना रोजगार नाकारणाऱ्या कारखानदारांच्या शासनाकडून दिल्या जाणाऱ्या परताव्यात कपात करण्याचा इशारा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी रांजणगाव एमआयडीसी येथे दिला.

रांजणगाव एमआयडीसी येथे आयोजित एका कार्यक्रमात देसाई यांनी उपरोक्त इशारा दिला.दरम्यान शिरूर शहर शिवसेना व नगरसेविका अंजली थोरात यांनी तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक संजय देशमुख,उपप्रमुख पप्पू गव्हाणे,शिरूर शहरप्रमुख मयूर थोरात,उपप्रमुख सुरेश गाडेकर,निखिल केदारी आदी यावेळी उपस्थित होते.खासदार आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २ वर्षापासून शहर शिवसेना व नगरसेविका थोरात यांच्यावतीने दिनदर्शिका प्रकाशित केली जात असून याचे सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोफत वाटप केले जात असल्याचे मयूर थोरात यांनी सांगितले.

एमआयडीसीमध्ये ८० टक्के स्थानिक तरुणांना रोजगार देणे अपेक्षित असल्याचे नमूद करून जे कारखानदार याची अंमलबजावणी करणार नाही. त्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या परताव्यात कपात केली जाईल असा इशारा उद्योग मंत्री देसाई यांनी दिला. रांजणगाव तसेच तळेगाव व चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांसाठी कामगार विमा योजना मंडळाचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री देसाई यांनी यावेळी सांगितले.कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील,,माजी आमदार पोपटराव गावडे,आंबेगाव शिरुर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.             

Leave A Reply

Your email address will not be published.