तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत आर एम डी ची श्रुती प्रथम

परीक्षा पे चर्चा पर्व - ६

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: शिरूर पंचायत समिती, शिक्षण विभाग आयोजित परीक्षा पे चर्चा पर्व-६ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत शिरूरच्या आर.एम.डी. इंग्लिश मिडिअम स्कूलमधील श्रुती गणेश नंदनकर (इयत्ता नववी) या विद्यार्थिनीच्या बेटी बचाव-बेटी पढाओ या चित्रास प्रथम क्रमांक मिळाला.
शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या प्रशस्त सभागृहात शिरूर पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने परीक्षा पे चर्चा पर्व-६ अंतर्गत तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेऊन नियोजित दिलेल्या दहा विषयांवर रेखाटन करून आकर्षक चित्र रंगवली.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक: श्रुती गणेश नंदनकर (इयत्ता नववी) आर.एम.डी.इंग्लिश मीडियम स्कूल,शिरूर,द्वितीय क्रमांक: जिनिषा गोरक्ष मलगुंडे (इयत्ता अकरावी), या विद्यार्थिनींच्या बेटी बचाव बेटी पढाओ या विषयांना मिळाला तर तृतीय क्रमांक:धनश्री मुकादम गवांडे (इयत्ता अकरावी) विद्याधाम प्रशाला जुनियर कॉलेज,शिरूर याच्या G-20 जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल या विषयावर काढलेल्या चित्राला मिळाला.
उत्तेजनार्थ: गायत्री वाळके- तळेगाव ढमढेरे, मयूर शिंदे- विठ्ठलवाडी, वैष्णवी खेडकर- रांजणगाव गणपती, सृष्टी ढगे- वढू बुद्रुक,जयश्री दिवटे-बाबुराव नगर,दीपक लांडे,प्रांजल मांडगे, श्रावणी खर्डे,अंकिता बत्ते,परिमल बंगाळे सर्व विद्याधाम प्रशाला, शिरूर
तसेच २५ विद्यार्थ्यांना विशेष नैपुण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेचे परीक्षण प्रवीणकुमार जगताप, प्रशांत शितोळे, अविनाश कुंभार ,धनलाल ठाकरे,ऋषिकेश सूर्यवंशी या कलाशिक्षकांनी केले.
या सर्व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते तीन आलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र तर १० उत्तेजनार्थ व २५ विशेष नैपुण्य प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले‌‌.यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम,विद्याधाम प्रशालेचे प्राचार्य पी.डी‌ कल्याणकर,पर्यवेक्षक एन.एस.देवळालीकर,विस्तार अधिकारी वंदना शिंदे,लक्ष्मण काळे, प्रदीप देवकाते, बाबुराव पाचंगे,विजय नरके,रमेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.आर एम डी स्कूलच्या प्राचार्या अश्विनी घारू यांनी श्रुतीचे अभिनंदन केले.
चित्रकला स्पर्धेचे विषय १)G-20 जागतिक विश्वगुरू बनण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल,२) आझादी का अमृत महोत्सव,३)सर्जिकल स्ट्राइक, ४)कोरोना लसीकरण मध्ये भारत नं.१,
५)पंतप्रधान जनसेवेच्या विविध योजना, ६)स्वच्छ भारत अभियान ,७)आत्मनिर्भर भारत, ८)आंतरराष्ट्रीय योग दिन मोदीजी निवेदले जगाचे लक्ष ,९)बेटी बचाव बेटी पढाओ,
१०)चुलीतल्या धुराच्या त्रासातून मुक्त महिला मोदींचा संवेदनशील निर्णय
या दहा विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

आर एम डी स्कूलच्या प्राचार्या अश्विनी घारू यांनी श्रुतीचे अभिनंदन केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.