स्वच्छता निरीक्षकाच्या तत्परतेमुळे नागरिकास मिळाला कचर्‍यात गेलेला दागिन्यांचा डबा

नागरिकाने मानले नगरपरिषदेचे आभार

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

 

शिरूर:अनावधानाने कचऱ्याच्या घंटागाडीत टाकला  गेलेला दागिने व रोख रकमेचा डबा स्वच्छता निरीक्षकाच्या तत्परतेमुळे संबंधित नागरीकास सुरक्षित पुन्हा मिळाला.हा डबा मिळाल्याने संबंधित नागरिकाने स्वच्छता विभाग व नगरपरिषदेनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

       शिरूर शहर व उपनगरांमध्ये घंटागाडी द्वारे कचरा उचलला जातो.आज सकाळी स्टेट बँक कॉलनी येथे कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आली असता तेथील नागरिक विद्याधाम प्रशालेचे अध्यापक छबन झावरे यांच्या घरातील चिमुकल्यांनी धान्याचे पीठ घंटागाडीत टाकले.या पिठामध्ये दागिने व रोख रक्कम होती.याबाबत चिमुकले हे अनभिज्ञ होते. घंटागाडी कचरा घेऊन तेथून निघून गेली.दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान पीठ व पिठा मधील दागिन्यांचा डबा जागेवर नसल्याचे झावरे यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आले.यामुळे गोंधळलेल्या झावरे यांनी घरात याबाबत चर्चा केली असता, पीठ सकाळी घंटागाडीत टाकण्यात आल्याचे त्यांना समजले. हे समजताच झावरे यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक डी.टी.बर्गे यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.बर्गे यांनी त्वरित स्वच्छता ठेकेदार वसीम सय्यद यांच्याशी संपर्क साधला व अनावधानाने कचरा गाडीत दागिन्यांचा डबा टाकला गेल्याची माहिती दिली.नगरपरिषद स्वच्छता विभागाच्या वतीने कचरा डेपोवर कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. यामुळे ठेकेदार वसीम यांनी दागिन्यांच्या डब्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तो डबा निदर्शनास आला.यावर त्यांनी त्वरित स्वच्छता निरीक्षक बर्गे यांना डबा सुरक्षित असल्याचे माहिती दिली.
           दागिन्यांचा डबा मिळताच स्वच्छता निरीक्षक बर्गे यांनी त्वरित झावरे यांच्याशी संपर्क साधून डबा सुरक्षित असल्याची माहिती दिली व डबा स्वीकारण्यासाठी कचरा डेपोवर येण्याची विनंती केली.दागिन्यांचा डबा सुरक्षित असल्याचे समजल्यावर झावरे यांचा जीव भांड्यात पडला.झावरे आपल्या कुटुंबीयांसमवेत कचरा डेपोवर पोचले.तेथे स्वच्छता व आरोग्य सभापती पवार व  बांधकाम समिती सभापती पाचर्णे यांच्या हस्ते झावरे यांना डबा सुपूर्त करण्यात आला.डबा मिळताच भावूक झालेल्या झावरे यांनी सर्वात प्रथम सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.ते म्हणालेमला माझा दागिन्यांचा डबा सुरक्षित मिळाला याबाबत मी स्वच्छता विभागाच ऋणी आहेच.मात्र नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनामुळे मला हा डबा मिळू शकला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.धारीवाल यांचे पारदर्शक नेतृत्व व नगराध्यक्षा वैशाली वाखारे,स्वच्छता आरोग्य सभापती पवार,मुख्याधिकारी महेश रोकडे व स्वच्छता निरीक्षक बर्गे यांचे या विभागावर असलेल्या नियंत्रणामुळे स्वच्छता विभाग आदर्शवत असे काम करत असल्याचे मला या निमित्ताने कचरा डेपोवर पहावयास मिळाले अशी कृतज्ञ भावना झावरे यांनी व्यक्त केली.स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार व बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे यांनी स्वच्छता व आरोग्य विभागाच्या निरीक्षक,कर्मचारी व ठेकेदार यांचे प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.