शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:राज्य शासनाने आज सामूहिक राष्ट्रगीत गायनाच्या केलेल्या आवाहनाला येथील गेंदाबाई जैन यांच्या अंतयात्रेच्या वेळी उपस्थित शोकाकुल जैन कुटुंबीयांसह नागरिकांनी प्रतिसाद दिला.राष्ट्रगीत गायानानंतर अंत्ययात्रा मार्गस्थ झाली.
राज्य शासनाच्या आवाहनानुसार आज सकाळी ११ वाजता प्रत्येक नागरिकाने आहे त्या ठिकाणी अथवा समूहाने राष्ट्रगीत गायचे होते.या आवाहनाला सर्व शासकीय,निमशासकीय तसेच खासगी कार्यालयासह सर्वत्रच प्रतिसाद मिळत होता.येथील निवृत्त बँक अधिकारी सुभाष जैन यांची पत्नी गेंदाबाई जैन यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार होते.शोकाकुल वातावरण असतानाही जैन कुटुंबीयांनी देशप्रेम दाखवत ११ वाजता राष्ट्रगीत म्हणण्यास तयारी दर्शवली.अंत्यसंस्कारासाठी त्यांचे शरीर तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती.११ वाजताच उपस्थित शोकाकुल नागरिकांनी सामुहिकरीत्या राष्ट्रगीत गायन केले.त्यानंतर अंत्ययात्रा मार्गस्थ होऊन गेंदाबाई यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.