शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये अमोल कोल्हे विजयी होणार - संजय देशमुख

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर:शिवसेनेच्या(उबाठा)वतीने आयोजित तिथिनुसार शिवजयंती निमित्त विविध पक्ष संघटनांच्या मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

जुनी नगरपरिषद कार्यालयाजवळ आरूढ करण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांसह इतर पक्ष संघटनेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनीही गर्दी केली.आमदार ॲड.अशोक पवार,शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,शिवसेना शहरप्रमुख संजय देशमुख,जिल्हा उपप्रमुख पोपट शेलार,शैलजा दुर्गे,राष्ट्रवादीचे(शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष विश्वासराव ढमढेरे,मराठा सेवासंघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे,राष्ट्रवादी लीगल सेलचे अध्यक्ष ॲड.रवींद्र खांडरे,माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे, मंगेश खांडरे,आबिद शेख,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे,समता परिषदेचे किरण बनकर,राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार,सागर नरवडे,अमोल चव्हाण,शिवसेनेचे महादेव कडाळे,पप्पू पवार,रमेश पवार,माणिक गव्हाणे,संतोष पवार,खुशाल गाडे,सुनील परदेशी,पोपटराव ढवळे,राजेंद्र चोपडा,आदींसह इतर मान्यवरांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

अनेक मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या कार्य,कर्तुत्वाची महती यावेळी विषद केली.संजय देशमुख यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत शिरूरमध्ये अमोल कोल्हे विजयी होणार असा दावा केला.त्यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनी सूत्रसंचालन केले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव निलेश खाबिया यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.