शिरूर:राजमाता जिजाऊंच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रसंग शिल्पाच्या माध्यमातून प्रदर्शित करणारी’जिजाऊ सृष्टी’ येथील जिजामाता उद्यानात साकारली जाणार असून शिवजयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाचे आज मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.प्रसिद्ध उद्योगपती,नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या निधीतून ही सृष्टी साकारली जाणार आहे.
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शहरातील जिजामाता उद्यानात जिजाऊंचा पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान व आदिशक्ती महिला मंडळ यांनी सभागृहनेते धारीवाल यांची भेट घेतली होती.मात्र पुतळा उभारण्याऐवजी जिजाऊंची महती सांगणारी जिजाऊ सृष्टी साकारू यासाठी लागणारा निधी मी देतो असे धारिवाल यांनी त्यांना आश्वस्त केले होते.यास सह्याद्री प्रतिष्ठान व आदिशक्तीने सहमती दर्शविल्याने गेल्या काही महिन्यांपूर्वी यासाठी प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली.पुणे येथील शिल्पकार सुतार यांना शिल्प तयार करण्यासाठी ऑर्डर देण्यात आली.दरम्यान आज शिवजयंतीचे औचित्य साधून आमदार ॲड.अशोक पवार,सभागृह नेते प्रकाश धारीवाल,नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या हस्ते या उपक्रमाचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी आमदार अशोक पवार यांनी जिजाऊसृष्टीसाठी निधी दिल्याबद्दल धारीवाल यांच्या दातृत्वाचे कौतुक करत धारीवाल यांचे दातृत्व थोर असल्याचे गौरवोद्गार काढले.आपल्या मातोश्री कमलाबाई धारीवाल यांच्या स्मरणार्थ जिजाऊ सृष्टीसह इंदिरा गांधी पुतळा व शहीद स्मारक यासाठी निधी दिल्याची माहिती यावेळी धारीवाल यांनी दिली.जिजाऊंचे कार्य महान असून जिजाऊ सृष्टीच्या माध्यमातून त्यांचे विचार शिरूरवासियांना पर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील असा विश्वास धारिवाल यांनी व्यक्त केला.सह्याद्री प्रतिष्ठान व आदिशक्ती महिला मंडळ यांनी जिजाऊसृष्टीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्याचे धारीवाल यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
पोलीस निरीक्षक सुरेश राऊत, जिल्हा परिषद सदस्य कोमल वाखारे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकीरखान पठाण, मराठा महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष शोभना पाचंगे,माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड.किरण आंबेकर,आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशिकला काळे,अध्यक्ष सुनंदा लंघे,सह्याद्री प्रतिष्ठानचे शिरूरचे अध्यक्ष कुणाल काळे,बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे,स्वच्छता आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार,पाणीपुरवठा व विद्युत समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी,महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती ज्योती लोखंडे, उपसभापती अंजली थोरात,नगरसेवक विनोद भालेराव, उज्वला बरमेचा,संगीता मल्लाव,मनीषा कालेवार,उज्वला वारे,सुनिता कुरंदळे,रोहिणी बनकर,विजय दुगड,रामलिंग महिला संस्थेचे अध्यक्ष आणि कर्डिले,मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शैलजा दुर्गे,शहराध्यक्षा उर्मिला फलके,प्रिया बिराजदार, वैशाली गायकवाड,माजी नगरसेवक निलेश लटांबळे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया,संतोष शितोळे,तुकाराम खोले,माजी उपसभापती अविनाश मल्लाव,उद्योजक सचिन कातोरे,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे,राष्ट्रवादी वकील सेलचे शहराध्यक्ष रवींद्र खांडरे,निलेश पवार,हाफिज खान,सागर पांढरकामे,रजुद्दिन शेख,राहील शेख,मनसेचे जनहित विभागाचे जिल्हाध्यक्ष सुशांत कुटे आदी यावेळी उपस्थित होते. योगेश जामदार व उमेश शेळके यांनी सूत्रसंचालन केले कुणाल काळे यांनी आभार मानले.जिजाऊ सृष्टी चे शिल्प तयार करणाऱ्या सुतार यांना धारीवाल यांच्या हस्ते ॲडव्हान्स धनादेश देण्यात आला.
सह्याद्रीची छोटी दुर्गसेविका देवांशी वाघ या कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.या कार्यक्रमावेळी शिवगर्जना करताना देवांशीच्या मुखातून पडणारा एक एक शब्द उपस्थितांमध्ये जोश निर्माण करून गेला.
शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने महिलांच्या हस्ते शिवरायांच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान आज सकाळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने येथील नगरपरिषद मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांच्या प्रदर्शनाचे धारीवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.२१ फेब्रुवारी पर्यंत नागरिकांना या प्रदर्शनाचा मोफत लाभ घेता येणार असल्याचे कुणाल काळे यांनी सांगितले.