शिरूरमधील रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करा,लागणारा खर्च मी देतो-प्रकाश धारिवाल

नगरपरिषदेच्या वतीनेही आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार               

0

शिरूनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: शिरूरमधील रुग्णांचे प्राण आमच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यांच्यासाठी कसल्याही परिस्थितीत प्राणवायू (ऑक्सिजन)उपलब्ध करून द्या. यासाठी लागणारा सर्व खर्च स्वतः करण्यास तयार आहे. अशी विनंती प्रांताधिकार्‍यांना केल्याचे नगर परिषद सभागृह नेते प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

          शिरूर शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू नये म्हणून काय उपाययोजना करता येतील व रुग्णांना काय मदत करता येईल यासंदर्भात आज सभागृहनेते धारीवाल यांनी पत्रकारांशी चर्चा केली.राज्यात सर्वत्रच ऑक्सिजनची मोठी टंचाई आहे.शिरूरमध्येही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. शिरुरमधील ऑक्सिजन टंचाईसंदर्भात धारिवाल यांनी आज आमदार अशोक पवार व प्रांताधिकारी संतोष देशमुख यांच्याशी चर्चा केली.शिरूर मधील जनतेचे प्राण आमच्यासाठी महत्त्वाचे असूून त्यांच्या लागणारा प्राणवायू (ऑक्सिजन) कसल्याही परिस्थितीत उपलब्ध करून देण्याची विनंती प्रांत अधिकारी देशमुख यांच्याकडे केली.यासाठी लागणारा खर्च देण्याची आपली तयारी आहे असे धारिवाल यांनी यावेळी सांगितले.शिरूर शहर कोरोनापासून कसे मुक्त होईल यासाठी ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहेे त्या उपाययोजना करण्यास नगरपरिषद कटिबद्ध आहे.मात्रर त्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे.असे धारिवाल म्हणालेे.कोविड सेंटर सुुरू करण्यासाठी डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ तसेच ऑक्सिजन याची गरज भासते. वैयक्तिकरीत्या अशाप्रकारे कोविड सेंटर सुरू करणे यामुळे शक्य होत नाही.कारण यातून काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाल्यास राजकारण होऊ शकते. मात्र सध्याच्या काळात राजकारण न करता आपल गाव कसे वाचेल यासाठी एकत्र प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. असे धारिवाल यांनी सांगितले.
       नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध नागरिकांनी कडकपणे पाळावेत असे आवाहन केले. कडक लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांचे सहकार्य अपेक्षित आहे मात्र ते मिळताना दिसत नसल्याची खंत वाखारे यांनी व्यक्त केली.दरम्यान पत्रकारांच्या विविध सूचनेनंतर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी उद्यापासून सकाळी ११ नंतर लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जाहीर केले. ज्यांच्या घरात व परिसरात कोरोनाचे रुग्ण आहेत म्हणजेच जो भाग प्रतिबंधित जाहीर करण्यात आला आहे,तेथील व्यक्तींनी बाहेर पडू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही रोकडे यांनी यावेळी दिला. सध्या चांता बोरा महाविद्यालयात १५० बेड उपलब्ध असून मागासवर्गीय मुलींचे हॉस्टेल तसेच थिटे महाविद्यालयात आणखी प्रत्येकी १०० असे २०० बेड उपलब्ध केले जाणार आहेत.शहरात कोणत्या कोविड सेंटर्समध्ये किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती देखील दररोज दिली जाणार आहे.अशी माहिती रोकडे यांनी दिली. बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचणें,स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती विठ्ठल पवार पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी, नगरसेवक सचिन धाडीवाल,संजय देशमुख,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे ,तुकाराम खोले, सागर पांढरकामे,सागर नरवडे आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.