शिरूरमधिल पथारीवाल्यांना प्रतिकारशक्ति वाढीच्या औषधाचे मोफत वाटप

तहसिलदार लैला शेख यांचा पुढाकार

0
शिरूर:कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी शहरातील भाजी,फळे,फुले तसेच इतर वस्तू विक्री करणाऱ्या पथारीवाल्यांना अर्सेनिक-३० या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधचे वाटप करण्यात आले. येथील होमिओपॅथीतज्ञ डॉ. दिनेश शहा यांनी मोफत औषध उपलब्ध करून दिले.

           लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले होत आहे.एक जूनपासून राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील सर्व व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.यामुळे रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे.दुकानदार चार भिंतिच्या आत सुरक्षितता बाळगून व्यवसाय करीत आहेत.मात्र रस्त्यावर फिरून अथवा रस्त्याच्या कडेल,हातगाडीवर भाजीपाला,फळे,फुले तसेच इतर वस्तूंची विक्री करणाऱ्यांच्या माथ्यावर ना छत ना कसली सुरक्षितता.ग्राहकांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो.ग्राहक सुरक्षित अंतर राखतीलच, त्यांनी मास्क वापरला असेलच याची शाश्वती नाही.अशात किमान या पथारीवाल्यांची प्रतिकारशक्ती वाढावी व त्यांचा संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून तहसिलदार लैला शेख यांनी पुढाकार घेतला.डॉ. दिनेश शहा यांच्याशी संपर्क साधून त्यांना अर्सेनिक-३० औषध उपलब्ध करण्याबाबत चर्चा केली.डॉ.शहा यांनी त्वरीत मोफत औषध उपलब्ध करण्यास होकार दिला.डॉ.शहा यांनी दोन हजारांहून अधिक व्यक्तिंना या औषधाचे वाटप केले आहे.
            तहसिलदार शेख यांनी आज स्वतः एसटी बसस्थानकाजवळील पथारीवाल्यांना औषधाचे वाटप केले.डॉ.शहा,पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी,नगरसेविका मनिषा कालेवार,आदिशक्ती महिला मंडळाच्या संस्थापिका शशीकला काळे,सामाजिक कार्यकर्ते बाबुराव पाचंगे आदि यावेळी उपस्थित होते.आदिशक्तीच्या महिला पथारीवाल्यांना या औषधाचे वाटप करणार आहेत.बाबुराव पाचंगे यांनी या औषधाविषयी माहितीपत्रकाची मोफत छपाई करून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.