शिरूरमध्ये ३५० किलो गोमांस जप्त

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडले

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:अहमदनगरहून शिरुरकडे गोमांस घेऊन येणाऱ्या कारचा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केला व शिरूर जवळ कारला रोखले.यावेळी उपस्थित पोलिसांनी कारची तपासणी केली असता,गोमांस आढळून आले.गोमंसची वाहतूक करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

        प्रतीक उर्फ नितीन रवींद्र अवचार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.नईम कुरेशी (वय २८, रा. झेंडी गेट,अहमदनगर) व अब्दुल कुरेशी ( वय ४३, रा.भाजीबाजार,शिरूर) अशी अटक दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अवचार व त्यांच्या सहकाऱ्यांना अहमदनगरहून शिरूरकडे गोमांस घेऊन कार येणार असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार अवचार हे गव्हाण वाडीजवळ (पारनेर हद्दीत सतरा कमानी पुलाजवळ) रस्त्याचा कडेला कारची वाट पाहत थांबले.काही वेळातच कार येताना दिसली.अवचार यांनी कारला हात केला असता,कार चालकाने कार न थांबवता जोरात पुढे नेली.अवचार यांनी कारचा पाठलाग केला.या दरम्यान त्यांनी त्यांच्या मित्रासह पोलिसांनाही कॉल करून कारबाबत माहिती दिली.कार सतरा कमानी पुलावरून शिरूर गावात वळली असता,पोलीस,अवचार,त्यांचे मित्र विजय मांडगर,अविष्कार लांडे,अक्षय करंजुले,पांडुरंग झुंजुर्के व देवानंद चव्हाण यांनी तेथे कार अडवली.पोलिसांनी कारची पाहणी केली असता कारमध्ये गोमांस आढळून आले.पोलिसांनी कार पोलीस ठाण्यात नेऊन दोघांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होईपर्यंत बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित होते.गोहत्या बंदी आमचा संकल्प असून शिरूर मधील ही पहिली कारवाई असल्याचे अजिंक्य तारू यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.