शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर शिरूरकरांनी नेहमीच अजित दादांना खंबीर पाठबळ दिलं असून यापुढेही पाठबळ मिळेल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी येथे व्यक्त केला.
शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन सुमित्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.माजी आमदार पोपटराव गावडे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे,शहराध्यक्ष शरद कालेवार, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे,पंचायत समितीचे माजी सभापती विश्वासराव कोहकडे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे,बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार,शशिकांत दसगुडे,माजी संचालक राजेंद्र गावडे,माजी नगराध्यक्ष मनीषा गावडे,श्रीनिवास घाडगे घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक सुधीर फराटे, रांजणगाव गणपतीचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संतोष शितोळे,युवकचे शहराध्यक्ष एजाज बागवान, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सोनू काळोखे क्रीडा विभागाचे शहराध्यक्ष अतुल गव्हाणे, विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष उमेश जाधव, दौलतराव खेडकर राजेंद्र गव्हाणे पाटील,पांडुरंग दुर्गे आदी यावेळी उपस्थित होते.
सुनेत्राताई म्हणाल्या,मला शिरूर नवं असले तरी, शिरुरकर नेहमीच दादांच्या पाठीमागे राहिले असल्याची मला कल्पना आहे.त्यांचे कायमच सर्वांवर लक्ष असते,सर्वांसाठी धडपड असते.हीच धडपड त्यांची कायम असणार आहे.माजी आमदार गावडे म्हणाले, शिरूर शहर व तालुक्यातील जनतेने कायमच दादांच्या निर्णयाला पाठिंबा दिला असून दादां अर्थमंत्री असताना शहर व तालुक्याला प्रचंड विकास निधी प्राप्त झाला आहे.या पुढील राजकारणात शिरूरचा खासदार,आमदार अजित दादांचाच असेल.एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेवर दादांचेच वर्चस्व असेल. असा विश्वास गावडे यांनी व्यक्त केला.शहराध्यक्ष शरद कालेवार यांनी स्वागत केले.तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी प्रास्ताविक केले. जयवंत साळुंके यांनी सूत्रसंचालन केलेतर संतोष शितोळे यांनी आभार मा
नले.