शिरूरकर नेहमीच आढळराव दादांच्या पाठीशी – कल्पनाताई आढळराव पाटील

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क 

शिरूर: शिरूरकर नेहमीच आढळराव दादांच्या पाठीशी राहिले असून यावेळी त्यांना विक्रमी मतदान करतील असा विश्वास कल्पनाताई आढळराव पाटील यांनी येथे व्यक्त केला.

शिरूर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातून पदयात्रा काढून मतदारांशी थेट संपर्क साधण्यात आला.पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला.यावेळी शिरूरकर विक्रमी मतदान करतील असा विश्वास कल्पनाताई यांनी शिरूरनामा’शी बोलताना व्यक्त केला.त्या म्हणाल्या, २००९ मध्ये शिरूर लोकसभा मतदार संघ तयार झाल्यावर आढळराव दादांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली.या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.या निवडणुकीत तत्कालीन आमदार तसेच शहरातील सत्ताधारी नगरसेवक,शिक्षण मंडळ सदस्य यांनी दादांच्या विरोधातील उमेदवाराचा प्रचार केला.तरीही शिरूर शहरातून दादांनाच आघाडी मिळाली. २०१४ मध्येही शिरूरकरांनी साथ दिली. २०१९ च्या निवडणुकीत दादा पराभूत झाले.तरीही शिरूर मध्ये दादांना आघाडी मिळाली.शिरूर साठी दादांनी वेळोवेळी मोठा निधी दिला.त्याची जाणीव ठेऊन शिरूर करांनी दादांना नेहमीच साथ दिली.शहरासाठी घोड धरणावरून पाणीपुरवठा योजना राबवली जाणार असून यासाठी लागणारा ७१ कोटींचा निधी दादांनी राज्य शासनाकडून आणला.या योजनेनंतर शिरूरकरांना भविष्यात पाणी समस्या कधीच भेडसावणार नाही.एकूणच दादांचे व शिरूरकरांचे एक प्रकारे ऋणानुबंध निर्माण झाले असून या निवडणुकीत ते दादांना विक्रमी मतांनी विजयी करतील असा विश्वास कल्पनाताई यांनी व्यक्त केला.

शहरातील विविध भागात कल्पनाताई व त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारांशी संवाद साधला.बहुतांशी ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला.भाजपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ॲड.धर्मेंद्र खांडरे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे,भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार,जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे,शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात,आर पी आय चे शहराध्यक्ष निलेश जाधव,माजी नगरसेविका मनीषा कालेवार,अंजली थोरात,रेश्मा लोखंडे, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे,तज्ञिका कर्डिले, यांच्यासह चारही पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.