शिरूरच्या नियोजनबद्ध विकासासाठी विकास आघाडी वचनबद्ध-प्रकाश धारीवाल

शहरात १२ कोटींची रस्त्यांची कामे

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:सत्ता हस्तगत केल्यापासून शहराच्या नियोजनबद्ध विकासाला  शिरूर शहर विकास आघाडीने प्राधान्य दिले असून त्या दृष्टिकोनातून आघाडीची यशस्वी व दमदार वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन सभागृहनेते प्रकाश धारीवाल यांनी केले.

        शहरातील विद्याधाम प्रशाला ते बाबुराव नगर बायपास या ७१ लाख रुपये खर्चाच्या डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा वैशाली वाखारे,बांधकाम समितीचे सभापती अभिजीत पाचर्णे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष,पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती विठ्ठल पवार, नगरसेवक विनोद भालेराव,संजय देशमुख,नगरसेविका संगीता मल्लाव,मनीषा कालेवार,सुरेखा शितोळे,सुनिता कुरंदळे,ज्योती लोखंडे मुख्याधिकारी अँड.प्रसाद बोरकर व स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.शिरूर शहराला कचरामुक्त शहर अभियानात देशात नववा क्रमांक मिळाल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.यातच शहरात विविध विकासकामे सुरू असल्याने आघाडीच्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.भूमिपूजनावेळी धारीवाल म्हणाले,आघाडी शहराच्या विकासासाठी वचनबद्ध असून विविध विकास कामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आघाडी समर्थपणे करीत आहे.सभापती पाचर्णे म्हणाले, शहरात सध्या चार कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे सुरू असून( यातील बहुतांशी कामे पूर्णत्वास आली आहेत.) जवळपास साडे आठ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत.या कामांसाठी निधी मंजूर असून लवकरच ही कामे सुरू होतील.यामध्ये प्रमुख्याने बोरा महाविद्यालय ते नवीन मार्केट यार्ड रस्ता, जुना पुणे नगर रस्ता,अंबिका माता मंदिर ते काचीआळी रस्ता,सर्टिफाइड स्कूल ते नवीन अग्निशामक दल इमारत,सुरज नगर मधील अंतर्गत रस्ते,जुना पुणे नगर रस्ता ते अमरधाम रस्ता तसेच विठ्ठल नगर स्टेट बँक कॉलनी,गुजर मळा,गणेश नगर,प्रीतम प्रकाश नगर आदी भागातील रस्त्यांचा समावेश आहे.एकूणच सभागृहनेते धारीवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासाला गती देण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू असल्याचे पाचर्णे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.