शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:गेली अनेक वर्षांपासून शिरूरमधील हिंदू मुस्लिम बांधव सर्व सणोत्सव एकोप्याने साजरा करीत असून हा भाईचारा कायम अबाधित रहावा अशी प्रार्थना नगरपरिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी ईद ए मिलादच्या कार्यक्रमाप्रसंगी केली.
गणेश विसर्जनाच्या दिवशी ईद असताना शिरूरमधील मुस्लिम बांधवांनी धारीवाल यांच्याशी सल्लामसलत करून विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचे धारीवाल यांनी जाहीर कौतुक केले व आभार मानले.धारिवाल म्हणाले,शिरूर मधील मुस्लिम बांधवांचा आम्हाला अभिमान आहे.शिरूर शहर हे सर्वसधर्म समभावाचे प्रतीक असून शहीदखान पठाण. रसिकलाल धारीवाल तसेच अजिमोद्दिन खान यांनी जपलेला भाईचारा टिकवून ठेवण्याची जबाबदारी आम्ही सांभाळत आहोत.मौलाना सोहेल रजा
यांनी मोहम्मद पैगंबर यांचे मानवतावादी विचार उपस्थितांसमोर मांडले.ते म्हणाले,पैगंबरांनी जगाला मानवता व भाईचाऱ्याचा तसेच दुसऱ्याचे दुःख समजून घेऊन त्याचे दुःख दूर करण्याचा संदेश दिला आहे.सर्व धर्माला एकमेकाप्रती प्रेम अभिप्रेत असून उच्च,नीच,मोठा छोटा तसेच रंगभेद मिटवण्याचा संदेश त्यांनी दिल्याचे मौलाना कैसर फैजी यांनी सांगितले.कोणाचे रक्त सांडणे,कोणाचे घर,जीवन उद्ध्वस्त करणे पैगंबरांना मान्य नव्हते.यामुळे त्यांनी जीवनभर मानवतेचा पुरस्कार केला.नामदेवराव घावटे,रवींद्र धनक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे,मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इकबालभाई सौदागर,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जकिरखान पठाण,मराठा महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष शोभना पाचंगे,माजी नगराध्यक्ष नसीम खान,रवी ढोबळे,विश्वास भोसले,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव,नगरसेवक संजय देशमुख,मंगेश खांडरे,नितीन पाचर्णे,सचिन धाडीवाल,माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे,माया गायकवाड,बापू सानप,शिक्षण मंडळ माजी सभापती निलेश खाबिया,संतोष शितोळे,तुकाराम खोले,निलेश जाधव,आसिफ खान,भाजपाच्या अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष रेश्मा शेख,रामलिंग संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले,काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष प्रिया बंडगर,मनसेच्या डॉ.वैशाली साखरे,अनघा पाठकजी,किरण बनकर,अविनाश घोगरे,राजुद्दिन सय्यद,हाफिज बागवान,राहील शेख, हुसैन शाह,कदिर सौदागर आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान इस्लाम धर्म ध्वजाला हार घालून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.अतिशय सुंदर अशा पेहरावात चिमुकले या मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले.शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणुकीने प्रस्थान केले.चौका चौकात मिरवणुकीचे सर्व धर्मियांनी स्वागत केले.अनेक ठिकाणी मिरवणुकीतील बांधवांना शीतपेय,खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.फिरोज बागवान यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले,जाकिर खान पठाण यांनी आभार मानले,