शिरूर शहरात कटके यांना मोठे मताधिक्य मिळेल – अंजली थोरात

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:महायुती सरकारने लोकोपयोगी राबविलेल्या योजना,अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली लाडकी बहिण योजना व याबरोबरच स्थानिक स्तरावर नागरिकांना धार्मिक सहलीची मिळालेली संधी यामुळे शहरात महायुतीचे उमेदवार माऊलीआबा कटके यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी नगरसेविका अंजली थोरात यांनी व्यक्त केला.

          शहरात महायुतीचे वतीने घरोघरी जाऊन कटके यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.शहरात ज्या ज्या भागात जात आहोत. तिथे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळतानाचे आशादायक चित्र आहे.महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात विविध लोकोपयोगी योजना राबविल्या.लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये देण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.शेतकरी,ज्येष्ठ नागरिक,युवक तसेच दिव्यांग अशा विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.यामुळे मतदार यावेळी महायुतीच्या उमेदवाराबरोबरच असणार असे चित्र आहे. पैशाअभावी ज्या नागरिकांना धार्मिक सहलीचा लाभ घेणे शक्य नाही अशांना धार्मिक सहलीची संधी मिळाल्याने हे नागरिक समाधान व्यक्त करत असून प्रचार यात्रेवेळी हे नागरिक कृतज्ञ भावना व्यक्त करत आहेत.अशा नागरिकांची मोठी संख्या आहे. अशा नागरिकांचा कटके यांना भरभरून आशीर्वाद मिळणार असल्याने शहरात त्यांना मोठी मताधिक्य मिळेल असे थोरात म्हणाल्या.
           महायुतीचे उमेदवार कटके हे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे निकटवर्तीय असून कटके यांना उमेदवारी मिळवून देण्यात आढळराव पाटील यांचे योगदान आहे.आढळराव यांचे शिरूर शहरावर विशेष प्रेम असून त्यांनी आतापर्यंत  ८२ कोटी रुपयांचा निधी शहराला दिला आहे.यात ७२ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना,३.५० कोटी रुपयांच्या नगरपरिषद शाळा इमारत,कचरा डेपोसाठी एक कोटी ६८ लाख, दशक्रिया घाट नूतनीकरण एक कोटी, रस्त्यांसाठी दोन कोटी अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.यामुळे आढळराव पाटील यांना शहराने नेहमीच मताधिक्य दिले आहे.आढळराव पाटील कटके यांना निवडून आणण्यासाठी सरसावले असून आढळराव पाटील यांच्यामुळे कटके यांना शहरात मताधिक्य मिळवण्यात फायदा होणार असल्याचे थोरात म्हणाल्या.शिरूर शहराचे भूषण प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांचे शहराच्या विकासात मोठे योगदान असून विकासासाठी धारीवाल यांनी ज्या ज्या वेळी आढळराव पाटील यांच्याकडे निधी मागितला त्यावेळी दादांनी शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला आहे. हे सर्व परिस्थिती पाहता शिरूर शहरात कटके यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.