शिरूर शहरासाठी १५२ कोटींचा निधी – आमदार अशोक पवार

शिरूर शहराप्रमाणेच रामलिंगचाही चेहरा मोहरा बदलणार

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला ध्यास असून यासाठी शहरात १५२ कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती आमदार ॲड.अशोक पवार यांनी दिली.प्रकाश धारीवाल यांचे शिरूरवर बारकाईने लक्ष तर आमदार पवार यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी. अशाप्रकारे धारीवाल व पवार यांनी एकमेकांचे कौतुक केले.

         पाबळ फाटा ते मोतीनाला (रामलिंग रोड) या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार पवार व शिरूर शहर विकास आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पवार यांनी उपरोक्त माहिती दिली.आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार,शहर राष्ट्रवादीचे (शरद पवार)अध्यक्ष मुज्जफर कुरेशी,शिवसेनेचे शहर प्रमुख (उबाठा) संजय देशमुख,जिल्हा उपप्रमुख पोपट शेलार, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच अरुण घावटे,विठ्ठल घावटे,विद्यमान उपसरपंच बाबाजी वर्पे,राष्ट्रवादी लीगल सेलचे शहराध्यक्ष ॲड.रवींद्र खांडरे, ॲड.शिरीष लोळगे,मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष शामकांत वर्पे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रभूलिंग वळसंगे,तुकाराम खोले, प्रा.विलास आंबेकर,राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष अमित शिर्के,जिल्हा उपाध्यक्ष निलेश पवार,राहील शेख,महिला तालुकाध्यक्ष संगीता शेवाळे,शहराध्यक्ष डॉ.स्मिता कवाद, युवती अध्यक्षा गीता आढाव आदी यावेळी उपस्थित होते.
          आमदार पवार म्हणाले,शिरूर शहराचे विकासाचे चित्र बदलण्याचा माझा ध्यास असून शहराच्या विविध विकास कामांसाठी १५२ कोटी रुपयांचा निधी आणला आहे.शहराचे वाढते नागरीकरण पाहता धारीवाल यांनी मागणी केल्याप्रमाणे ७१ कोटी रुपयांची चिंचणी धरण ते शिरूर या पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक त्या सर्व विभागाच्या परवानग्या घेऊन दिल्या.शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या या योजनेचे लवकरच काम सुरू होणार आहे.शिरूर न्यायालयाची इमारत तसेच निवास व्यवस्था यासाठी ५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.पाबळ फाटा ते मोती नाला या टप्प्यानंतर पुढील टप्प्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला जाणार असून शिरूर शहराला जोडणारे सर्व रस्ते १० मीटर रुंदीचे केले जाणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.
          शिरूरसाठी स्वतंत्र उपविभागीय पोलीस कार्यालय सुरू करण्यासाठी विधानसभेत मुद्दा मांडला.त्यानुसार हे कार्यालय येथे कार्यान्वित झाले.प्रांताधिकारी कार्यालय देखील येथे आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.शिरूर ग्रामीण ( रामलिंग ) परिसराचाही वेगाने विस्तार होत असून सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या रामलिंग यात्रोत्सवासाठी मोठी गर्दी होत असते.धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली रामलिंग परिसराचा देखील चेहरा मोहरा बदलण्याचा मानस पवार यांनी यावेळी वक्त केला.शिरूर ग्रामीणचे उपसरपंच बाबाजी वर्पे यांनी शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत कार्यालयाची अद्यावत इमारत उभारणीसाठी सहकार्य करण्याची मागणी आमदार पवार यांच्याकडे केली होती.याबाबत प्रतिसाद देताना चांगली इमारत करून देण्याचे आश्वासन आमदार पवार यांनी यावेळी दिले.
आमदार पवार यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी
धारीवाल म्हणाले,आमदार पवार यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असून भविष्याचा विचार करून ते काम करीत असतात.रामलिंग परिसरात देखील नागरीकरण वाढतानाचे चित्र असून अनेक शाळा,महाविद्यालये सुरू झाली आहेत.याचा विचार करून रामलिंग रोड रुंद करण्यासाठी आमदारांनी निधी आणला आहे.शहरासाठी लागणाऱ्या चिंचणी ते शिरूर या पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार पवार यांचे मोलाचे योगादान असल्याचे धारीवाल यांनी सांगितले.
पाबळ फाटा ते सर्टिफाईड स्कूल या रस्त्यासाठी साडेचार कोटींची तरतूद
पाबळ फाटा ते मोती नाला हा सध्याचा रस्ता साडेपाच मीटर असून नव्याने हा रस्ता दहा मीटर केला जाणार आहे. या रस्त्याबरोबरच आमदार पवार यांनी पाबळ फाटा ते सर्टिफाईड स्कूल या रस्त्यासाठी देखील साडेचार कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुजफ्फर कुरेशी यांनी दिली.यामध्ये फुटपाथ,पावसाळी गटार,तीन छोटे पूल तसेच दुभाजक असणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.