शिरूर : कारेगांव मधिल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एक दिवस शहरातील रूग्णालयात दाखल होता.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुढील पाच दिवस शिरूर शहर पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारेगांव येथिल ८० वर्षीय महिला कोराना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. छातीत दुखत असल्याने या महिलेस ९ मे रोजी बाबूराव नगर येथील श्रीगणेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथून त्यांना अहमदनगर व त्यानंतर पुणे येथे उपचारार्थ हलवण्यात आले. तेथे त्यांची कोराना टेस्ट पॉझिटीव्ह आली. ही महिला प्रथम येथील श्रीगणेशा रुग्णालयात दाखल होती. यामुळे या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स, मेडिकल स्टोअर्समधिल कर्मचारी, शिरूरमधून रुग्णालयात जाणारे इतर असे एकूण पंचवीस जणांना चौदा दिवस रुग्णालयातच क्वारंटाईन करण्यात आल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. शहरातील ही परिस्थीती पाहता शहरात चिंतेचे वातावरण तयार झाले.आमदार अॅड. अशोक पवार व सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली. कोरोना दाराजवळ येऊन पोचल्यााने त्याला दूर ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे होते. त्यानुसार उद्यापासून पाच दिवस काही ठराविक मेडिकलची दुकाने वगळता शहर पूर्ण बंद राहणार आहे.

![]() |
ReplyForward
|