शिरूरमध्ये गरीब कोविड रुग्णांना मोफत उपचार मिळणे अवघड
फूले योजनेतंर्गत मिळणारे मानधन परवडणारे नसल्याचे रूग्णालयांचे म्हणणे
शिरूरनामा न्यूजनेटवर्क
शिरूर: .महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मानधन परवडणारे नसल्याचे कोविड सेंटर्ससाठी अधिग्रहीत खासगी रुग्णालयांचे म्हणणे असल्याने सद्या तरी गरीब कोविड रुग्णांना या योजनेतंर्गत मोफत उपचार मिळणे अवघड आहे.या रुग्णालयांनी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडेे ही कैफियत मांडली असून शासनाच्या मानधनात काम करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहेे.