शिरूर केसरी’ येलभर याच्याकडून ‘महाराष्ट्र केसरी’च्या अपेक्षा- आमदार अशोक पवार  

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:येथील प्रसिद्ध मल्ल रघुनाथदादा पवार यांच्यानंतर महाराष्ट्र केसरी पदाला कोणालाच गवसणी घालता आली नाही.नुकतेच ‘शिरूर केसरी’चे यश संपादन केलेल्या ओमकार येलभर याच्याकडून  महाराष्ट्र केसरी किताबाची अपेक्षा असून तो शिरूरकरांच्या अपेक्षा पूर्ण करेल.असा विश्वास आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केला.
             शिरूर केसरी स्पर्धेत शिरूर केसरी चा मान
 मिळवलेल्या ओमकार येलभर व उपविजेता आदित्य पवार यांचा येथील मोठी तालीम येथे आमदार पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी पवार बोलत होते.कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अॅड. वसंतराव  कोरेकर, माजी सभापती शशिकांत दसगुडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मीकराव कुरंदळे,जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, उपमहाराष्ट्र केसरी सचिन येलभर,कुस्तीचे राष्ट्रीय प्रशिक्षक सोनू तंवर,नगरपरिषद आरोग्य समिती सभापती विठ्ठल पवार,माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे, पै.शशिकांत माने, महाराष्ट्र चॅम्पियन पै.अशोक पवार,निलेश लटांबळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया, कुस्तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष झंडू पवार,शिरूर ग्रामीणचे सरपंच नितीन बोऱ्हाडे,माजी सरपंच विठ्ठल घावटे,अण्णापुरचे सरपंच पप्पू पवार,कर्डेलवाडीचे सरपंच राजेंद्र दसगुडे,मोटेवाडीचे माजी सरपंच संदीप येलभर,शिरूर ग्रामीणचे माजी उपसरपंच तुषार दसगुडे,पै.बबन पवार,राजेंद्र भोसले,बंडू गिरे,हनुमंत गव्हाणे,कैलास सातपुते,पै.आशिष शिंदे,सखाराम फंड,खेतमाळीस,हरीभाऊ वीर,किरण पाचर्णे आदी यावेळी उपस्थित होते.
           महाराष्ट्रातील अनेक मल्लांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केल्याचे सांगून आमदार पवार म्हणाले,येथील मोठ्या तालमीतील मल्ल रघुनाथदादा पवार यांनी केवळ महाराष्ट्र केसरी किताबालाच नव्हे,तर राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे नाव उज्ज्वल केले. पवार यांच्या नंतर शिरूरच्या मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालता आलेली नाही.ओमकार मात्र महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालेल.असा विश्वास आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केला.येथील मोठ्या तालमीत आपणही कधीकाळी सराव केल्याचे सांगून पवार म्हणाले, या तालमीचा हवा तितका विस्तार होऊ शकला नाही.मात्र शहरात नव्याने होणार असलेल्या तालुका क्रीडासंकुलात अद्यावत तालीम उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आमदार पवार यांनी यावेळी दिले.
शिरूर केसरी किताब पटकावलेला ओमकार येलभर याचे वडील पै संतोष येलभर यांचे मागील वर्षी कोरोनामुळे निधन झाले.आपल्या कुटुंबातील व्यक्तीने महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घालावी तसेच पुढेही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आपले नाव कमवावे अशी संतोष यांची प्रचंड इच्छा होती.ओमकार याने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन माजी नगरसेवक प्रवीण दसगुडे यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.