शिरूर ग्रामीण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होणार

आमदार अशोक पवार यांचा पुढाकार

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:शिरूर ग्रामीण (रामलिंग)येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु केले जाणार असल्याचे आमदार अशोक पवार यांनी  सांगितले. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीमध्ये होत असलेल्या नियोजनबद्ध विकास कामांबद्दल आमदार पवार यांनी सरपंच नामदेवराव जाधव व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब शेळके त्यांचे कौतुक केले.

           शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या नूतन कार्यालय व वाचनालयाचे उद्घाटन आमदार पवार व नगरपरिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आले.बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे,नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे,नगर परिषद पाणीपुरवठा समितीचे सभापती विठ्ठल पवार,शिरूर ग्रामीणचे चे सरपंच नामदेवराव जाधव, माजी आदर्श सरपंच अरुण घावटे, करडे चे सरपंच सुनील इसवे, कळवंतवाडी सरपंच दादासाहेब चव्हाण, शिरूर ग्रामीण चे माजी सरपंच रामभाऊ जामदार,उपसरपंच बाबाजी वर्पे, बाळासाहेब जाधव,शरद पवार,रामलिंग महिला संस्थेच्या अध्यक्ष राणीताई कर्डिले, गौतम घावटे, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, शिरूर ग्रामीण चे सर्व आजी-माजी सदस्य यावेळी उपस्थित होते.
          आपल्या सरपंच पदाच्या कालावधीत शिरूर ग्रामीण मध्ये एक कोटी ८८ लाख रुपयांची विकास कामे पूर्ण झाल्याची माहिती यावेळी सरपंच जाधव यांनी दिली.यामध्ये शिरूर ग्रामीण भागात विविध ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण भुयारी गटार योजना, पेविंग ब्लॉक,शाळांमध्ये रंग रंगोली, संरक्षण भिंत, दुरुस्ती,विविध प्रकारचे शालेय साहित्य तसेच इतर कामांचा समावेश आहे. ग्रामपंचायतीने नवीन स्मशानभूमीचे बांधकाम केले असून या ठिकाणी सुंदर अशा  उद्यानाची निर्मिती केली आहे. स्मशान भूमीच्या बाजूला असलेल्य पिढ्यानपिढ्या विनावापर क्षेत्राचा विकास करताना हा परिसर स्वच्छ करून तिथे वृक्षारोपण तसेच वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जाधव यांनी यावेळी सांगितले कोविड-१९ कालावधीत स्वनिधी तसेच माजी उपसरपंच संजय शिंदे, सोनू अभंग व राणी कर्डिले यांच्यासह कंपनी सीएसआर फंडाच्या सहकार्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांना मदत करण्यात आली.
         बोऱ्हाडे मळा येथे बाजार समितीचे संचालक संतोष मोरे, शिरूर ग्रामीणचे माजी उपसरपंच भरत बोऱ्हाडे, बाबाजी वर्पे यांनी उपलब्ध करून दिलेल्या ओपन स्पेस मधील १४ गुंठे जागेमध्ये स्मशानभूमी उभारण्यात येणार असून या ठिकाणी उद्यान तसेच इतर सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सरपंच जाधव व ग्रामविकास अधिकारी शेळके यांनी सांगितले. ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच जाधव यांनी संबंधितांचे आभार मानले. ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट असून ग्रामस्थांनी वेळेत कर जमा करावा असे आवाहन सरपंच जाधव यांनी केले आहे. ग्राम विकास अधिकारी शेळके यांनी प्रास्ताविक, माजी उपसरपंच भरत बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रामपंचायत सदस्य यशवंतराव कर्डिले यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.