शिरूर ग्रामीण रुग्णालयात कोविड आरोग्य सेंटर सुरू करावे -आयएमए

खासगी रुग्णालये अधिग्रहित केल्यास त्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात

0

शिरूर . कोविड आरोग्य केंद्रासाठी खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यापेक्षा शासनाच्या ग्रामीण रुग्णालयात समर्पित कोविड आरोग्य सेंटर सुरु करावे.आम्ही आएएमएचे सर्व डॉक्टर्स तेथे सेवा देण्यास तयार आहोत.असे निवेदन आयएमए ( इंडियन मेडिकल असोसिएशन )शिरूर शाखेच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.

शिरूर तालुक्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाने खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील एक रूग्णालय अधिग्रहित करण्यात आले असून इतर रुग्णालये अधिग्रहित केली जाणार आहे.या पार्श्वभूमीवर आयएमए शिरूर शाखेच्या वतीने प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आले.आयएमएच्या म्हणण्यानुसार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे.त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत.आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोविड रुग्णाच्या सानिध्यात आलेल्या डॉक्टरचे सात दिवस विलगीकरण करणे, यासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष असणे आवश्यक आहे. या तत्वांचे पालन न केल्यास कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या डॉक्टरांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे.शासनाने शिरूरमध्ये खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यााचा निर्णय घेतला आहे यानुसार शहरातील मातोश्री मदनबाई माणिकचंद धारीवाल रुग्णालय शासनाने अधिग्रहीत केले आहे.याठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये शहरातील तज्ञ डॉक्टरांना सेवा देण्यास नियुक्त करण्यात आले आहे.ऑन कॉल सेवा देणे या डॉक्टरांना बंधनकारक आहे. दररोज वेगवेगळ्या तज्ञ डॉक्टरांंना ऑन कॉल सेवा देणेे बंधनकारक केल्यास या डॉक्टरांचेे विलगीकरण करणेे शक्य होणार नाही.मुळात या डॉक्टरांसाठी विलगीकरण कक्षच उपलब्ध नसल्याचेेेे वास्तव आहे.तज्ञ डॉक्टर्स सेवा देण्यास तयार आहेत.मात्र आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन न झाल्यास आमच्यामुळेच संसर्ग वाढण्याचा धोका शासनाने लक्षात घेणे गरजेचेेे असलयाचे आयएमएने निवेदनात म्हटले आहे.

शहरात जे रुग्णालय अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्या रुग्णालयात कोविडचा पहिला रुग्ण दाखल होताच तेथील सफाई व आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर येणे बंद केले आहे.वास्ताविक कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनच खासगी रूग्णालयांना या स्वरुपाच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.कोविड रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाल्यास या समस्येत आणखी भर पडणार आहे. या समस्या पाहता शासनाने शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तसेच शासन नियुक्त स्वच्छता व आरोग्य कर्मचारी उपलब्ध असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात कोविड आरोग्य केंद्र सुरू करावे.आम्ही तेथे आयएमएचे सर्व सदस्य सेवा देऊ अशी ग्वाही निवेदनात देण्यात आली आहे. खासगी रुग्णालये अधिग्रहित करताना आयसीएमआरच्या तत्वांचे पालन व्हावे तसेच डॉक्टराना पॅरामेडिकल सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात अशी अपेक्षा आयएमएच्या वतीने करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.