शिरूर सायकल राईड २०२१’मुळे अवघे शिरूर झाले सायकलमय
प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल राईडचे आयोजन
शिरूर नामा न्यूज नेटवर्क
शिरूर: सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘शिरूर सायकल राईड२०२१’ मध्ये शेकडो शिरुरकर सहभागी झाल्याने अवघे शिरूर शिरूरमय झाल्याचे दिसून आले.निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने आपल्या फिटनेसकडे लक्ष देणे गरजेचे आहे.असे मत नगर परिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी यावेळी व्यक्त केले.
धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर नगरपरिषद, सायक्लोन ग्रुप व ग्रीन थॉट्स यांच्या वतीने ‘शिरूर सायकल राईड २०२१’ चे आयोजन करण्यात आले होते. धारीवाल यांचेसह नगराध्यक्ष वैशाली वाखारे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सायकल राईड ची सुरुवात करण्यात आली. धारीवाल यांच्यासह त्यांची पत्नी दीना भाभी धारिवाल, मुलगा आदित्य धारिवाल,मुलगी साक्षी धारीवाल यांनी या राईड मध्ये सहभाग घेतला.राईडच्या समारोप प्रसंगी धारीवाल यांनी फिटनेस संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले.आज पहाटे शिरूर नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीपासून सायकल राईड ला सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगट तसेच स्तरातील नागरिकांनी सायकल राईड मध्ये सहभाग घेतला. डोक्यावर हेल्मेट, व्यायामाचा सूट, चेहऱ्यावर मास्क परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या शिरूरकरांमुळे अवघे शिरूर सायकलमय झाल्याचे दिसून आले.आयोजनामध्ये सहभागी असलेल्या सायक्लोन ग्रुप व ग्रीन थॉट्स च्या सदस्यांनी विशिष्ट ड्रेस कोड परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.नगरपरिषद इमारतीपासून काची आळी,मुंबई बाजार,कापड बाजार, रामआळी, विद्याधाम प्रशाला, जुनी नगरपरिषद इमारत ते पुन्हा नवीन नगर परिषद इमारत अशा मार्गाने सायकल राईड काढण्यात आली. नवीन नगर परिषद इमारतीजवळ सायकल राईडचा समारोप करण्यात आला.
मुख्याधिकारी महेश रोकडे ,बांधकाम समिती सभापती संगीता मल्लाव, पाणीपुरवठा समिती सभापती मुजफ्फर कुरेशी,स्वच्छता वआरोग्य समिती सभापती विठ्ठल पवार,महिला बालकल्याण सभापती मनीषा कालेवार,नगरसेवक अभिजीत पाचणें, सचिन धाडीवाल, मंगेश खांडरे,निलेश गाडेकर,संजय देशमुख उज्वला बरमेचा,सुरेखा शितोळे,सुनिता कुरंदळे,रोहिणी बनकर,अंजली थोरात,,पूजा जाधव, रेश्मा,लोखंडे,ज्योती लोखंडे,युवा नेते हृषिराज पवार,नगरपरिषद आरोग्य निरीक्षक दत्तात्रय बर्गे,पाणीपुरवठा विभाग प्रमुख भगवान दळवी,पल्लवी खिलारे,सुप्रिया बोराटे ,सायक्लोन ग्रुपचे महेंद्र फुलफगर कुमार बरमेचा,प्रितेश कोठारी, गंगाधर आगलावे,अमोल कर्नावट,आनंद मुथा,ज्ञानेश मांढरे,प्रीतम भळगट,विशल जोशी,परेश बोथरा तसेच ग्रीन थॉट्स चे सोनाली बरमेचा,शिल्पा संघवी,पुनम गांधी यांच्यासह शिरूर शहरातील विविध स्तरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.धरमचंद भवरीलाल अँड सराफ हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.मुख्याधिकारी रोकडे यांनी प्रास्ताविक,संजय बारवकर यांनी सूत्रसंचालन केले तर महेंद्र फुलफगर व कुमार बरमेचा यांनी आभार मानले.
सायकल वर्ल्ड पुणे यांच्यावतीने सभागृहनेते धारीवाल यांना एक सायकल भेट देण्यात आली.
]