शहर व परिसरात शिवजयंती उत्साहात साजरी

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरुर:छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार निरंतर प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सभागृहनेते प्रकाश धारिवाल यांनी केले.शहर व परिसरात विविध संस्था संघटनांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
        शिवजयंतीनिमित्त श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास शहरातील विविध स्तरातील मान्यवरांनी हजेरी लावून शिवरायांना अभिवादन केले. यावेळी धारीवाल यांनी शिवरायांबद्दल आपले विचार व्यक्त केले.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत,नगराध्यक्ष वैशाली वाखारे ,उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र धनक,संपदा पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर डेरे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेवराव घावटे,पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे,माजी नगराध्यक्ष नसिम खान,रवींद्र ढोबळे,बांधकाम समिती सभापती अभिजीत पाचर्णे, स्वच्छता आरोग्य समिती सभापती विठ्ठल पवार,पाणीपुरवठा व विद्युत समिती सभापती मुजफ्फर कुरेशी, महिला बालकल्याण सभापती ज्योती लोखंडे, उपसभापती अंजली थोरात,नगरसेवक विनोद भालेराव,मंगेश खांडरे,उज्वला बरमेचा,संगीता मल्लाव,मनीषा कालेवार,सुनिता कुरंदळे,उज्वला वारे,सुनिता कुरंदळे,रोहिणी बनकर,विजय दुगड,माजी नगरसेवक निलेश लटांबळे,किरण पठारे,रवींद्र सानप,अय्युब सय्यद  यावेळी उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना वसुंधरा संवर्धनाची शपथ देण्यात आली. शिवजयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीचा वतीने स्वर्गिय धनराज नहार स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.यंदाचे व्याख्यानमालेचे २५ वे वर्ष आहे.दरम्यान समस्त सकल मराठा समाज संघ,अखिल भारतीय मराठा महासंघ,शिवसंभाजी प्रतिष्ठान,तिरंगा प्रतिष्ठान रेव्हन्यू कॉलनी,जनसेवा रिक्षा संघटना यांचा वतीनेही शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.