शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:केवळ जयंती,पुण्यतिथी पुरतेच नव्हे तर सावित्री बाईंच्या विचारांचे रोज स्मरण तसेच आचरण व्हायला हवे. असे मत वैभवी पतसंस्थेच्या अध्यक्षा आशा पाचंगे यांनी व्यक्त केले.
वैभवी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पाचंगे यांनी मनोगत व्यक्त केले.मुकुंद ढोबळे,अभिजीत आंबेकर, पोपट पाचंगे अनिल सोनवणे अर्जुन बढे या पत्रकारांसह पतसंस्थेच्या उपाध्यक्षा नंदा खैरे,सचिव राजश्री ढमढेरे,संचालिका चोभे, मीरा काळे,संगीता धोंगडे,संगीता रोकडे,आरती शिंदे,नीलिमा मोहाडे,राधा जाधव, सई खैरे,सुनीता भनगडे,सुषमा शितोळे,सदस्य अरुण महाजन,शोभा जगदाळे,मनीषा आंबे कर,सोनाली सरोदे, विजया टेमगिरे,जयश्री जगताप, रोचना धापटे,सुनीता चौगुले,सविता दसगुडे,सुरेखा भाटी, प्रा.चंद्रकांत धापटे आदी यावेळी उपस्थित होते.
पाचंगे म्हणाल्या,सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी दिलेल्या योगदानामुळे तसेच त्यांच्या विचारांच्या प्रेरणेमुळे आज आम्ही महिला या स्तरावर काम करीत आहोत.महिलांनी एकत्र येऊन वैभवी पतसंस्थेची स्थापना केली.जिद्द व मेहनतीच्या बळावर आज आमच्या पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे.संस्थेने महिलांना तसेच महिला बचत गटांना कर्ज देऊन आर्थिक प्रगतीची द्वारे खुली केली.महीलांबरोबरच पुरुषांनाही व्यवसायासाठी कर्ज वाटप केले जात आहे.वैभवी महासंघाच्या माध्यमातून बचत गटांची चळवळ उभारण्यात आली असून या माध्यमातून सामाजिक योगदानही दिले जात आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती तसेच सावित्री बाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.संगीता रोकडे यांनी सावित्रीबाईंवर लिहिलेल्या लेखाचे वाचन केले.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेऊन त्यांना वैभवी पतसंस्थेची दिनदर्शिका भेट देण्यात आली.यावेळी पवार यांनी पतसंस्थेची माहिती घेऊन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्याचे अध्यक्षा पाचंगे यांनी सांगितले.कल्पना चोभे यांनी सूत्रसंचालन केले,संगीता धोंगडे यांनी आभार मानले.