संभाजी महाराजांचा अवमान करणारा माहिती फलक मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने हटविला

संभाजी ब्रिगेडचा दणका

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याच्या संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्याची दखल घेत श्री मोरया गोसावी मंदिर व्यवस्थापनाने महाराजांविषयी अवमानकारक असणारा माहिती फलक अखेर हटविला.याबाबत मंदिर व्यवस्थापकाने दिलगिरीही व्यक्त केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिली.
           चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरातील माहिती फलकावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी त्यांचा वध झाला असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला होता.याबाबत आक्षेप घेत
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी ४ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा दिला होता.याची दखल घेत मंदिर व्यवस्थापनाने वध हा शब्द हटवून बलिदान शब्दाचा समावेश केला होता.मात्र यावर समाधान न झाल्याने ब्रिगेडने ॲड.अतुल पाटील यांच्यामार्फत नोटीस पाठवून हा फलक पूर्ण काढून खरा इतिहास सांगणारा फलक लावण्याची मागणी केली होती.११ ऑगस्ट रोजी पाठवण्यात आलेल्या नोटीसीनुसार,या माहिती फलकातील मजकुर पुर्णपणे काल्पनिक असुन कोणत्याही पुराव्यांचा अभ्यास न करता लिहीलेला आहे. सदरचा मजकुर हा माहिती फलकावर तसाच ठेवण्यात आल्यास मंदिरात येणाऱ्या कोणत्याही शिवप्रेमींची भावना दुखवली जाईल.तसेच त्यामुळे दोन समाजात जातीय तेढ निर्माण होवू शकते. त्यामुळे ही नोटीस मिळाल्यापासुन दोन दिवसांच्या आत आपल्या मंदिरात लावण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर असणारा फलक त्वरीत हटविण्यात यावा,अशी मागणी करण्यात आली होती.आठ दिवसाच्या आत यावर कार्यवाही करण्याची मागणी नोटीस मध्ये नमूद करण्यात आली होती.संभाजी ब्रिगेडच्या या दणक्यानंतर सदरचा माहिती फलक हटविण्यात आला असून मंदिर व्यवस्थापनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी दिलीआहे

Leave A Reply

Your email address will not be published.