शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे आयोजित मा. नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारीवाल चषक (पी आर डी) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत साईराम क्रिकेट संघ पी आर डी चषकाचा मानकरी ठरला.मिर्झा इलेव्हन,शिरूर संघ उपविजेता ठरला.विजेता व उपविजेता संघास चषकासह अनुक्रमे एक लाख व ७५ हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे व शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत शिंदे यांच्या वतीने दिवंगत उद्योगपती रसिकलाल माणिकचंद धारिवाल व दिवंगत शिवसेवा मंडळ सचिव केशरसिंग खुशालसिंग परदेशी या दोन मित्रांच्या स्मरणार्थ मा नगराध्यक्ष प्रकाशशेठ रसिकलाल धारिवाल चषक( पी आर डी)क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सुसज्ज मैदान, आकर्षक प्रेक्षक गॅलरी, स्पर्धेचे एलईडी स्क्रीन तसेच युट्युब वर लाईव्ह प्रक्षेपण, व जोश पूर्ण क्रिकेट सामन्यांचे समालोचन यामुळे प्रेक्षणीय ठरलेल्या या स्पर्धेत शिरूर सह शिरूर बाहेरील संघांनी सहभाग घेतला. सलग तीन दिवस या संघांच्या मॅचेस पार पडल्या यात येथील साईराम क्रिकेट संघ व मिर्झा इलेव्हन,शिरूर या संघांनी अंतिम फेरी गाठली. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या अंतिम सामन्यात साईराम क्रिकेट संघाने आपल्या वैविध्यपूर्ण खेळाने प्रेक्षकांची मने जिंकत पीआरडी चषकावर आपला ठसा उमटविला. सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते विजेत्या संघांना पीआरडी चषक प्रदान करण्यात आले.
माजी आमदार पोपटराव गावडे, पोलीस उपनरीक्षक एकनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष नसीम खान,माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, संतोष कडेकर, शरद कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, माजी नगरसेवक अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार,प्रविण दसगुडे,
भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे, शिवसेवा मंडळाचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी,मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे,संघपती भरत चोरडिया,उद्योजक सुभाष गांधी,डॉ.संतोष पोटे, राष्ट्रवादी वकील सेलचे शहराध्यक्ष अॅड.रवींद्र,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शहराध्यक्ष रंजन झांबरे, उद्योजक राजेंद्र ,शिक्षण मंडळाचे माजी सभापती तुकाराम खोले, संतोष शितोळे,जयवंत साळूके,जयसिंग धोत्रे,प्रितेश गादिया संजय ढमढेरे, आदर्श सरपंच अरुण घावटे विठ्ठल घावटे, बाबुराव पाचंगे, फिरोज शेख, निलेश कोळपकर, सागर नरवडे ,संतोष शिंतोळे, संदीप घावटे,सागर ढवळे ,राहुल पवार सनी , त्रिमुखे, अमोल पवार बाळासाहेब साळवे, पोपट चव्हाण,राजेंद्र ढोबळे विजय ढोबळे अजय ढोबळे तुषार माने ऋतिक ढोबळे तेजस माने, रवींद्र गुळादे, राजेंद्र माने , तुषार माने, चेतन माने ,संतोष माने,लखन कोळपकर , कुणाल धाडीवाल, निलेश पवार, उपस्थित होते.
गेली नऊ वर्षांपासून माजी नगराध्यक्ष ढोबळे पीआरडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करीत असून देखण्या आणि नेटक्या आयोजनामुळे या स्पर्धेने आपला एक वेगळा ठसा उमटविला आहे. याबाबत आयोजक माजी नगराध्यक्ष ढोबळे व शिंदे यांचे कौतुक करताना प्रकाश धारिवाल म्हणाले, या स्पर्धेचा दर्जा स्पर्धेगणिक उंचावत असून या स्पर्धेच्या महतीमुळे शिरूरचे नाव राज्यपातळीवर झळकवण्याचे काम ढोबळे व शिंदे यांनी केले आहे. माजी नगराध्यक्ष ढोबळे म्हणाले, दानशूर उद्योगपती प्रकाशजी धारीवाल यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील क्रिकेटर्सना भविष्यात राज्य तसेच देशपातळीवर नावलौकिक मिळवण्याची संधी उपलब्ध व्हावी असा आहे. स्पर्धेतील अनेक खेळाडूंची प्रतिभा पाहता यांच्यातून पुढे नामांकित खेळाडू तयार होतील असा विश्वास ढोबळे यांनी व्यक्त केला.
स्पर्धेतील इतर विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
तृतीय क्रमांक- यशवंत पाचंगे इलेव्हन पारगाव, ६१ हजार रुपये व चषक, चतुर्थ क्रमांक जुन्नर इलेव्हन -४१ हजार रुपये व चषक.अनिकेत ताकवणे हा
उद्योगपती आदित्य शेठ धारीवाल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला.त्याला हिरो होंडा मोटरसायकल बक्षीस म्हणून देण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज राजू पाटे एलईडी टीव्ही, उत्कृष्ट गोलंदाज उस्मान मिर्झा एलईडी टीव्ही, उत्कृष्ट किपर सनी दळवी, उत्कृष्ट झेल अमोल पवार, सलग तीन विकेट किरण मोरे, सलग तीन षटकार स्वप्निल भालेराव, सलग तीन चौकार वसीम शेख या पाचही जणांना सायकल भेट देण्यात आली. माजी नगराध्यक्ष यांनी प्रास्ताविक, प्रशांत शिंदे यांनी स्वागत,
घावटे यांनी सूत्रसंचालन तर जयवंत साळुंखे यांनी आभार मानले.
.