साहेब,थोडे श्रेय आम्हालाही द्या….

मोटसायकल चोर पकडुन देण्यात येथील तरुणांची पोलिसांना मोलाची मदत

0

साहेब,थोडे श्रेय आम्हालाही द्या….

शिरूर:गुन्ह्यांची उकल असो वा इतरही बाबतीत नागरिकांचा सहभागाबाबत पोलीस नेहमीच अपेक्षा करतात.मात्र जेव्हा नागरिकांचे सहकार्य लाभते तेव्हा मात्र त्यांना त्याचे श्रेय द्यायचे नाही.असे प्रकार घडतात.येथील चार तरुणांनी जोखीम स्वीकारून
मोटरसायकल चोरांना पकडुन देण्यासाठी पोलिसांना मोलाची मदत केली.पोलिस मात्र सोयीस्कररित्या सर्व विसरले.
         काल पोलिस उपविभागीय अधिकारी यशवंत गवारे यांच्या उपस्थितीत  शिरूर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक संजय जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन आंतरजिल्हा मोटरसायकल चोरांना जेरबंद केल्याची माहिती दिली.या ठाण्याचे पोलिस वैभव झाडबुके यांना रात्र गस्ती वेळी संशयित रित्या दोघेजण आढळून आले.त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे सांगण्यात आले.ही माहिती अर्धसत्य असल्याचे शिरूरनामाच्या निदर्शनास आले.प्रतीक शर्मा या तरुणाने निदर्शनास आणलेले पूर्ण सत्य असे,शनिवारी रात्री १२ ते १२.३० दरम्यान प्रतीक शर्मा हा तरुण रामआळी येथील आपल्या घराच्या टेरेसवर उभा असताना त्याला पिपाडा या कपड्याच्या दुकानासमोर मोटरसायकल चोरण्याच्या कोणीतरी प्रयत्न करीत असल्याचा संशय आला.त्याने प्रथम पोलिस ठाण्याच्या दूरध्वनी क्रमांकावर (०२१३८- २२२१३९ ) संपर्क साधला.मात्र संपर्क होऊ शकला नाही.त्यानंतर त्याने ११२ क्रमांकावर संपर्क साधला.यावर झाडबुके हे शर्माच्या घराजवळ आले.ते येण्याआधीच संशयित तेथून पसार झाले होते.यावर,लक्ष असुदे असे सांगून झाडबुके गेले.यावेळी शर्मा याने त्याचा मित्र सुमेध सारडा व त्याचा भाऊ यश शर्मा यालाही कॉल केला.ते दोघे तेथे आल्यावर त्याने दोघांना लक्ष ठेवण्यास सांगितले.यानंतर शर्मा हा घराच्या खाली आला.समोर राहत असलेल्या बिहानी यांना त्यांची दुचाकी आत घेण्यासाठी सांगत असताना त्याला लाल रंगाची कानटोपी घातलेला व त्याच्या सोबत चेहऱ्यावर भगव्या रंगाचा पंचा गुंडाळलेला त्याचा साथीदार दुचाकीवरून जाताना दिसला.त्याने त्वरित पुन्हा ११२ क्रमांकावर संपर्क साधला.झाडबुके पुन्हा तेथे आले.त्यांनी शर्मा यास गाडीत बसण्यास सांगितले.तेथून ते लोखंडे यांच्या गल्लीतून बसस्थानक बाजूस गेले.फुलविक्रेते जेथे बसतात त्याठिकाणी दोघे संशयितरित्या आढळून आल्यावर झाडबुके यांनी गाडी थांबवली.त्यांच्याकडे चौकशी केली असता,त्यांनी पाथर्डी येथील असल्याचे सांगितले.त्यांच्या जवळील मोटरसायकल कोणाची याची माहिती विचारली असता त्यांच्याकडून व्यवस्थित उत्तर न मिळाल्याने झाडंबुके यांनी त्यांना गाडीत बसवून पोलिस ठाण्यात आणले.तेथे पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी त्यांच्या जवळील मोटरसायकल अहमदनगर येथून चोरल्याचे तसेच पुणे,नगर शहर व जिल्ह्यातून ७ मोटरसायकली चोरलीची कबुलीही दिली.या घटनाक्रमावेळी प्रतीक शर्मा हा पहाटे चार वाजेपर्यंत पोलिसांसमवेत होता.त्याने,त्याचे मित्र व भावांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चोर जेरबंद होण्यास मदत मिळाली.निश्चितच चोरांना जेरबंद करण्यात झाडबुके यांची भूमिका महत्त्वाची आहे.त्याचे कौतुकही झाले पाहिजे.मात्र यांनी जोखीम पत्करून पोलिसांना चोर पकडुन देण्यात मोलाची कामगिरी बजावली.त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे होते.
         काल पत्रकार परिषदेत पोलिस उपविभागीय अधिकारी गवारी व निरीक्षक जगताप यांनी सामाजिक सहभागाची अपेक्षा व्यक्त केली होती.ती अपेक्षा रास्तही आहे.मात्र जेव्हा अशा सहभागाने पोलिसांना मदत होते.तेव्हा त्याबद्दल कृतार्थ भावना देखील व्यक्त व्हायला हव्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.