एस.के.खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स या सुवर्णदालनाचे उद्या उद्घाटन
प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल व दिनाभाभी धारीवाल यांच्या हस्ते उद्घाटन
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर: एस.के.खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स या सुवर्णदालनाचे उद्घाटन उद्या (१९फेब्रु.) सकाळी १० वा.प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल व दिनाभाभी धारीवाल यांच्या हस्ते पार पडणार असल्याची माहिती शंतनुभैय्या खांडरे यांनी दिली.
गेली २०० वर्षांची उज्वल व विश्वासार्ह परंपरा लाभलेल्या या प्रख्यात सुवर्ण पेढीची पाचवी पिढी ग्राहकांच्या सेवेत असून येथील सुभाष चौकातील दुमजली इमारतीत भव्य सुवर्णदालन उभारण्यात आले आहे. चिनप्पा खंडोजी खांडरे, काशिनाथ चिनप्पा खांडरे, सदाशिव काशिनाथ खांडरे,सतीश सदाशिव खांडरे व सुरेश सदाशिव खांडरे व त्यानंतर शंतनू सुरेश खांडरे असा या पिढीचा यशस्वी प्रवास असून व्यवसायाबरोबरच सेवाभाव जपण्याची आपल्या पिढीची परंपरा जपत शंतनु भैय्या खांडरे यांनी मोठी भरारी घेण्याचे कौशल्य दाखवून दिले आहे.मनमोहक,कलात्मक व आधुनिक हॉलमार्क प्रमाणित दागिने या सुवर्ण दालनात उपलब्ध होणार असून कमी मजुरी हे वैशिष्ट आहे.ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मोठ्या दालनात स्थलांतर करण्याची संधी आम्हाला लाभली असून या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा.असे आवाहन शंतनु खांडरे यांनी केले आहे.
पाचव्या पिढीचा ग्राहकसेवेचा अखंडित झरा..
आजही तोच विश्वास जपतोय खरा…
(Advt.)