RBI कडून टॉप 50 कर्जबुडव्यांची थकित कर्ज राईटऑफ; यादीमध्ये मेहुल चोकसी, विजय मल्ल्यासह रामदेवबाबांचाही समावेश
नवी दिल्ली : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेने देशातील अनेक कर्जबुडव्यांची कर्ज माफ केली आहेत. रिझर्व्ह बँकेकडून जवळपास 50 कर्जदारांची 68607 कोटींची कर्ज बँकांकडून माफ करण्यात आली आहेत. यामध्ये हिरे व्यापारी असलेल्या कर्जबुडव्या मेहुल चोक्सी, विजय माल्या यांच्यासह अनेक मोठ्या कर्जदारांचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेकडून माहिती अधिकारांतर्गत देण्यात आलेल्या उत्तरातून ही माहिती उघड झाली आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2019 अखेर ही कर्ज माफ करण्यात आल्याचं सांगितलं आहे.