रघुनाथदादा पवार यांचा महाराष्ट्र केसरीचा वारसा तालुक्यातील मल्ल पुढे नेतील -आमदार अशोक पवार
आमदार पवार यांनी व्यक्त केला विश्वास
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते मल्ल रघुनाथदादा पवार यांचा महाराष्ट्र केसरी किताबाचा वारसा तालुक्यातील मल्ल पुढे नेतील. असा विश्वास आमदार अशोक पवार यांनी येथे व्यक्त केला.
शहरातील प्रसिद्ध मोठ्या तालमित मल्लांना सरावासाठी नवीन मॅट उपलब्ध करण्यात आली. आमदार पवार यांच्या हस्ते या मॅटचे पूजन करण्यात आले.यावेळी आमदार पवार बोलत होते.शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुकुमार बोरा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती मुजफ्फर कुरेशी,माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, मधुकर उचाळे,माजी नगरसेवक शशिकांत माने,शिक्षण मंडळाचे माजी सभापती संतोष शितोळे,समता परिषदेचे किरण बनकर,वैभव खाबिया भैया खांडरे,तालमीचे जेष्ठ वस्ताद गेणभाऊ येलभर,गोविंद नरवडे,पंढरीनाथ शेजवळ विश्वनाथ पवार,विजय गव्हाणे,शिवाजी वीर,गुणाजी पवार,मधु कटके,विठ्ठल जाधव,वस्ताद क्षिरसागर,सत्तारभाई,शाहीदभाई,फंड,पुणे जिल्हा केसरी बालाजी गव्हाणे,शिरूर केसरी जयदीप बेंद्रे,शिवाजी जगताप,पप्पू नाझिरकर,गणेश वाघमारे,प्रशांत चोरे, भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, १९७५ साली रघुनाथदादा पवार यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावून शिरूर तालुक्याच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवला.यानंतर ४५ वर्ष उलटूनही तालुक्याला हा मान मिळू शकला नाही. तालुक्याला पुन्हा हा मान मिळण्यासाठी तालुक्यातील मल्लांनी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे आवाहन आमदार पवार यांनी यावेळी केले. सुकुमार बोरा यांनी मोठ्या तालमीचा इतिहास उलगडून सांगितला. ही तालीम उभारण्यासाठी जुन्या ज्येष्ठ मल्लांनी डोंगरावरून दगड वाहिले. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या या तालमीतून विविध जाती-धर्माचे मल्ल तयार झाले. दत्तू भाऊ कालेवार यांची आठवण सांगताना,कालेवार यांनी अनेक मल्ल घडवल्याचे बोरा यांनी यावेळी सांगितले. मॅटमुळे मल्लांना चांगल्या सरावाची संधी उपलब्ध झाली असून यातून चांगल्या दर्जाचे मल्ल तयार होतील असा विश्वास उद्योजक धरमचंद फुलफगर यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी नगरसेवक पै, अशोक पवार व त्यांचे सहकारी त्रिदल सेना तालुका अध्यक्ष बबन पवार, हरिभाऊ वीर, राजाभाऊ भोसले,बंडू गिऱ्हे,संतोष येलभर,हनुमंत गव्हाणे,कैलास सातपुते,आशिष शिंदे, संदीप पवार,संजय पवार, बंडू खांडरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पै.अशोक पवार यांनी प्रास्ताविक केले, शिरूर तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष झेंडू पवार यांनी स्वागत केले तर उपमहाराष्ट्र केसरी सचिन येलभर यांनी आभार मानले.