पुढील वेळेस मुख्यमंत्र्याची बायको म्हणून या
९२ वर्षीय पार्वतीबाई शितोळे यांचा सुनेत्रा पवार यांना आशीर्वाद
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:आज उपमुख्यमंत्र्यांची बायको म्हणून आलात पुढच्या वेळेस मुख्यमंत्र्याची बायको म्हणून या.असा आशीर्वाद ९२ वर्षीय पार्वतीबाई शितोळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना दिला.
शिरूर राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन तसेच शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी येथे आलेल्या सुनेत्राताई यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे यांच्या निवासस्थानी भेट दिली.यावेळी त्यांनी शितोळे यांच्या मातोश्री पार्वतीबाई शितोळे यांची आस्थेने विचारपूस केली.यावेळी पार्वतीबाई यांनी,आज उपमुख्यमंत्र्यांची बायको म्हणून आलात पुढच्या वर्षी मुख्यमंत्र्याची बायको म्हणून या असा आशीर्वाद सुनेत्राताईंना दिला.सुनेत्राताईंनीही पार्वतीबाईंना तब्येतीची काळजी घेण्याची प्रेमपूर्वक भावना व्यक्त केली.जिजामाता महिला सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा सुरेखा शितोळे,माजी नगरसेविका मनीषा कालेवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.