शिरूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपाच्या वतीने ‘सेवा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत आज शहरातील शासकीय कार्यालयांच्या आवारात स्वच्छता करण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपाच्या वतीने १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर या कालावधीत सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे. आज शहरातील तहसीलदार कार्यालय, पोलिस स्टेशन व पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबविले.नगरसेवक, भाजपा शहराध्यक्ष नितीन पाचर्णे,कार्याध्यक्ष मितेश गादिया,नगरसेवक संदिप गायकवाड,सरचिटणीस विजय नर्के, युवामोर्चा अध्यक्ष उमेश शेळके, शिक्षक आघाडीचे अशोक शेळके,अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष हुसेन शहा, उपाध्यक्ष रेश्मा शेख, सोशल मिडिया अध्यक्ष हर्षद ओस्तवाल, युवामोर्चा सरचिटणीस ओंकार ससाणे, युवामोर्चा उपाध्यक्ष शिवम पाठक आदि यावेळी उपस्थित होते.