प्रत्येक धर्म मानवता व भाईचार्‍याची शिकवण देतो-प्रकाश धारीवाल

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:मोहम्मद पैगंबरांनी शांतता,मानवता तसेच भाईच्र्याऱ्याची शिकवण दिली.वास्तविक प्रत्येक धर्माची शिकवण ही चांगलीच असून त्याचे प्रत्येकाने अनुकरण करणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे असे मत प्रसिद्ध उद्योगपती,माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी येथे  व्यक्त केले.

        मोहम्मद पैगंबर जयंती अर्थात ईद-ए-मिलाद निमित्त शिरूर मुस्लिम जमातीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धारीवाल बोलत होते. धारीवाल म्हणाले, शिरूर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे या शहरात प्रत्येक जाती धर्माचे सण उत्सव मोठ्या धुमधडाक्यात तसेच प्रेमाने साजरे केले जातात.सर्वधर्मीय बांधव एकमेकांच्या सण उत्सवात उत्साहाने सहभागी होतात.शहरात मानवता हाच धर्म जोपासला जातो.रसिकलाल धारीवाल तसेच शहीदखान पठाण यांनी शहराचा एकोपा व भाईचारा टिकवण्यासाठी मोलाचे योगदान दिले.स्वतः मी व जाकिरखान पठाण ही परंपरा टिकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा धारीवाल यांनी आवर्जून उल्लेख केला.मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीप्रमाणे भाईचारा कायम ठेवत ईद साजरी करूयात असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी केले.मौलाना सोहेल म्हणाले, ज्या मातीत,ज्या देशात जन्मलो त्या मातीवर, त्या देशावर प्रेम करण्याची शिकवण मोहम्मद पैगंबरांनी दिली.ज्यांनी पैगंबरांची शिकवण अंगीकारली ते अतिरेकी होऊ शकत नाही,ते कुणाचं रक्त सांडू शकत नाही.अतिरेकी कारवाया करणारे ,दुसऱ्याचे रक्त सांडणारे फक्त नावाचेच मुसलमान आहेत.पुणे जिल्हा भाजपाचे सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, पोपटलाल ओस्तवाल, मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इकबालभाई सौदागर,बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे,माजी नगराध्यक्ष नसीम खान, रवींद्र ढोबळे, नगरसेवक मंगेश खांडरे, माजी नगरसेवक दादाभाऊ वाखारे,प्रवीण दसगुडे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया,संतोष शितोळे, तुकाराम खोले, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच नामदेवराव जाधव,भाजपाचे शहराध्यक्ष केशव लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले,सुजाता पाटील,पोलीस हवालदार राजेंद्र गोपाळे,मनसे पुणे जिल्हा जनहित विभागाचे अध्यक्ष सुशांत कुटे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष राजुद्दीन सय्यद,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हाफिज बागवान, आदेश बोरा,बांधकाम व्यावसायिक आरिफ सय्यद,मोनिब शेख आदी यावेळी उपस्थित होते.
         दरम्यान मुस्लिम जमात तसेच आझाद सोशल क्लबच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.मिरवणुकीमध्ये चिमुकल्यांचा मोठा सहभाग होता.अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील पालखी मार्गाने मिरवणूकीचे प्रस्थान झाले.कब्रस्तान येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.अल मदद बैतूल माल कमिटीचे अध्यक्ष फिरोज बागवान यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.