अजित पवार यांच्या सभेला जमलेली तोबा गर्दी निकालाची चुणूक दाखविणारी!

सभेची उपस्थिती पाहून भावकी आज रात्री झोपणार नाही- अजित पवारांचा टोला

0

शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्या प्रचारार्थ न्हावरे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला आज तोबा गर्दी पहावयास मिळाली.यातच अजित दादांनी काहीसे मिश्किल मात्र शिरूर हवेलीच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट मांडणारे भाषण करत जनतेची मने जिंकली.एका अर्थाने तोबा गर्दी व अजित दादांच्या भाषण सभेचा मास्टरस्ट्रोक व निकालाची चुणूक दाखवणारी ठरली.

गेल्या काही दिवसांमध्ये शिरूर हवेली मतदारसंघ’ माऊली ‘मय झाल्याचे वास्तव आहे.ग्रामीण भागासह शहरी भागातही माऊली यांच्या नावाचीच चर्चा ऐकावयास मिळत आहे.प्रचाराला एक दिवस बाकी असताना आज महायुतीच्या वतीने न्हावरे येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तोबा गर्दी जमली.अशा गर्दीत पवार यांची एन्ट्री झाली.या सभेत त्यांनी कळीचा मुद्दा असणारा रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा विषय घेतला.कारखाना बंद झाला याबाबत आमदार अशोक पवार उपमुख्यमंत्री पवार यांना जबाबदार धरत आहेत. यावर पवार म्हणाले,अरे बेटा यासाठी मला जबाबदार धरून माझी का बदनामी करतोस.कारखाना बंद पडण्यात अनेक कंगोरे आहेत.मला जर भावकीला त्रास द्यायचा असता तर, पहिला व्यंकटेश कृपा कारखानाच बंद पाडला असता.मी बंद पाडणाऱ्या पैकी नव्हे तर मदत करणारा कार्यकर्ता नाही.कारखान्यात संचालक मंडळाला कोणताच अधिकार नव्हता.यात अध्यक्षाची चूक झाली म्हणून कारखाना रसातळाला गेल्याचे सर्वांनी पाहिले.कारखान्याची मार्च २०२४ ची परिस्थिती पाहता कारखान्यावर २९० कोटी रुपयांचे कर्ज,६४ कोटीचा तोटा,८४ कोटी रुपये राज्य सहकारी बँकेचा एन पी ए (यात आजी माजी संचालकांना जप्तीची नोटीस निघाली आहे.) आहे.बँक ऑफ बडोदाने थकीत कर्जामुळे जप्तीची नोटीस काढली आहे.बँक ऑफ इंडिया,न्हावरेची ३० कोटींची थकबाकी,कामगारांचे पगार व इतर देणी मिळून ३५ कोटी रुपयांचे देणी आहेत.कर्मचाऱ्यांच्या नावावर घेतलेले कर्ज एनपीएत गेल्याने कामगारांना १०१ ची नोटीस आली आहे.या सर्व बाबी पाहता घोडगंगाने या बँकांच्या एन ओ सी घेतले नाही.भाग भांडवल कमी परिणामी कर्जशक्ती कमी असल्याने कारखान्याचा एन सी डी सी चा कर्जाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही.

एन सी डी सी हा विषय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हातात आहे.त्यांच्या माध्यमातून मी अनेक कारखान्यांना मदत केली आहे.घोडगंगेस जरी अडचण असली तरी तुम्ही माउलींना साथ दिल्यास एन सी डी सी चे काम करून आणण्याची व कारखाना पुढील वर्षी सुरू करण्याची जबाबदारी माझी.असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिला. कामगारांचे,शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कदापि भरून निघणार नाही. या वर्षीचा हंगाम सुरू झाला असला तरी दौंड शुगर,पराग अंबालिका,श्रीनाथ मस्कोबा, माळेगाव,सोमेश्वर या कारखान्यांना विनंती करून तुमच्या उसाचे टिपूर तुमचे राहणार नाही.अशी व्यवस्था करतो असेही पवार यांनी उस उत्पादक शेतकऱ्यांना आश्र्वासित केले.मतदार संघातील प्रलंबित काही कामे असतील ती मार्गी लावतो असे सांगताना मतदारसंघाचा वेगाने विकास करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.पुढील सहा महिन्यांनी दिवसा वीज मिळणार असल्याचे सांगून पवार म्हणाले,यामुळे बिबट्याचा,रानडुक्कर तसेच गव्याचा धोका कमी होईल.मांडवगण प्रकरणामुळे तेथे पिंजरे तसेच इतर साहित्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.माय माऊलींच्या योजना पाच वर्ष चालू राहतील.वीजबिल माफी ,कांदा निर्यात बंदी,ज्या पिकाला भाव नाही त्या पिकाला योग्य भाव मिळवून देण्याकरता केंद्राला हस्तक्षेप करायला सांगून आयात निर्यात धोरण चांगल्या पद्धतीने राबावण्याचे महत्त्वाचे काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

पवार म्हणाले,उमेदवार माऊली कटके यांनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली असून कर्तव्यदक्ष,संवेदनशील नेतृत्व म्हणून माऊलींची ओळख दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.अशा नव्या दमाच्या तरुणास नेतृत्व करण्याची संधी देण्याचे आवाहन पवार यांनी केले.भाषणाच्या शेवटी उपस्थिती पाहून उपमुख्यमंत्री पवार यांनी,आजची सभा पाहून भावकीला रात्री झोप येणार नाही.असा आमदार पवार यांना टोला लगावला.एकूणच उपमुख्यमंत्री पवार यांचे भाषण व तोबा गर्दी आजच्या सभेचे मास्टर स्ट्रोक व निकालाची चुणूक दाखवणारी ठरल्याचीच चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.