नामदेवराव जाधव खऱ्या अर्थाने कार्यक्षम सरपंच- आमदार अँड.अशोक पवार  

जाधव यांच्या वतीने रावलक्ष्मी फाउंडेशनला ५१ हजारांची देणगी

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर: नामदेवराव जाधव यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी शिरूर ग्रामीणला चागला सरपंच लाभला असून अल्पावधीतच त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.खऱ्या अर्थाने ते कार्यक्षम सरपंच आहेत. असे मत आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

        आपल्या वाढदिवसानिमित्त सरपंच जाधव यांनी  शिरूर हवेली मतदार संघात कोविड केअर सेंटर उभारून स्पृहणीय असे काम करणाऱ्या रावलक्ष्मी फाउंडेशनला ५१ हजार रुपयांची देणगी दिली.या देणगीचा धनादेश जाधव यांनी आमदार पवार यांच्याकडे सुपूर्त केला.यावेळी आमदार पवार यांनी जाधव यांचे कौतुक करताना उपरोक्त विधान केले.ते म्हणाले,चांगली दूरदृष्टी असलेल्या कार्यकर्त्यांची समाजकारण व राजकारणात नितांत गरज आहे.सरपंच जाधव यांच्याकडे अशी दूरदृष्टी असून आपल्या सरपंचपदाच्या अल्प कालावधीतच त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.वृक्षारोपण,पर्यटन स्थळाप्रमाणे विकसित केलेली स्मशानभूमी यासह जाधव यांनी केलेल्या इतर विकासकामांचे आमदार पवार यांनी विशेष कौतुक केले.जाधव यांनी आमदार पवार व जिल्हा परिषद कृषी,पशु संवर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार या दांपत्याबरोबरच रावलक्ष्मी फाऊंडेशन शिरूर हवेली मतदारसंघात करीत असलेल्या उल्लेखनीय कामाची प्रशंसा केली.पवार कुटुंबियांच्या या योगदानाची प्रेरणा घेऊन निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच जाधव यांनी सांगितले
         रावलक्ष्मी फाउंडेशन करीत असलेल्या कार्याला हातभार लावण्यासाठी शिरूर हवेलीतून अनेक व्यक्तींनी फाऊंडेशनला यथाशक्ति देणगी दिली.यात बहुतांशी जणांनी आपले वाढदिवस,लग्नाचे वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून फाउंडेशन करीत असलेल्या कार्यासाठी योगदान दिले.


Leave A Reply

Your email address will not be published.