एम ई पी एल विरोधात लढा तीव्र करण्यासाठी शनिवारी बैठक
दहा गावातील पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शक,महिला उपस्थित राहणार
शिरूर महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनी विरोधात विरोधातील लढा पुढे सुरू ठेवण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवारी दहा गावांच्या वतीने तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिरूर ग्रामीणचे माजी आदर्श सरपंच अरुण घावटे यांनी दिली.
महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीच्या प्रदूषणाविरोधात शिरूर ग्रामीणच्या पुढाकाराने नऊ गावातील ग्रामस्थांनी लढा उभारला आहे.सोमवार दि. २६ रोजी एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ग्रामस्थांचे म्हणणे ऐकल्यानंतर या संदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्याच्या सुतोवाच करून एमआयडीसी तसेच एमपीसीबी च्या अधिकाऱ्यांनी कंपनी दहा दिवसांसाठी बंद ठेवण्याचे तोंडी आदेश दिले.तसेच कंपनीला देऊ केलेले वाढीव ६२ एकर क्षेत्र रद्द करण्यात बाबतही अहवाल पाठवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंधरा वर्षांपासून या कंपनीचे विरोधात लढा सुरू असून अनेक आंदोलने झाली.मात्र या ग्रामस्थांच्या एकीच्या लढ्याला पहिल्याच प्रयत्नात अंशतः यश आले. यामुळे बळ मिळालेल्या नऊ गावातील ग्रामस्थांनी ही कंपनी कायमची बंद करण्याचा एल्गार केला असून यासाठी कंपनी विरोधात लढा सुरू ठेवण्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शिरूर ग्रामीण येथील रामलिंग सांस्कृतिक भवन येथे सकाळी ११ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे माजी सरपंच घावटे यांनी सांगितले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे एम ई पी एल कंपनी विरोधातील आजपर्यंत प्रस्तुत केलेल्या कागदपत्रांचा पाठपुरावा करून या मंडळावर काय कारवाई करता येईल याबाबत, एम ई पी एल कंपनीच्या गेटवर घातक कचरा घेऊन वाहनांवर कारवाई तसेच आंदोलन करण्यासंदर्भात, राज्याचे उद्योग मंत्री तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष यांच्याशी पत्र व्यवहार करण्यासंदर्भात, कंपनी विरोधातील आंदोलनासाठी कृती समिती स्थापने, बाधित गावातील ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकने आदी बाबींवर या बैठकीत विचारविनिमय केला जाणार असल्याचे सरपंच शिल्पा गायकवाड व उपसरपंच बाबाजीअण्णा वर्पे यांनी सांगितले. शिरूर नगरपरिषदेसह शिरूर ग्रामीण,आमदाबाद, निमगाव भोगी,अण्णापुर,सरदवाडी, कर्डेलवाडी,कारेगाव रांजणगाव गणपती,ढोक सांगवी आदी गावांतीलन गराध्यक्ष,नगरसेवक,सरपंच,उपसरपंचसदस्य, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ मार्गदर्शकम,हिला भगिनी आदींना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले असून कंपनीच्या प्रदूषणा संदर्भात ज्यांच्याकडे काही कागदपत्रे,अहवाल असतील त्यांनी ती बैठकीत घेऊन यावे. असे आवाहन माजी सरपंचघावटे यांनी केले आहे.