मराठा आरक्षण खंडित होता कामा नए

शिरूर मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

0

शिरूरनामा न्यूज वेटवर्क

शिरुर:मराठा आरक्षण खंडित होवू न देता पूर्ववत चालू ठेवावे यासह इतर मागण्यांचे निवेदन आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तहसिलदारांकडे सुपुर्त करण्यात आले.

कोरोनाचे सावट पाहता ठराविकच मराठा बांधव प्रतिनिधी एकत्र आले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार,न्यायालयाने  एसईबीसी मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सुपुर्त करताना जो स्थगिती आदेश दिला आहे.याविषयी घटनातज्ञांच्या व कायदेविषयक तज्ञांच्या सल्ला घेवून सदरची स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक तो कायदेशीर मार्ग अवलंबावा,कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा उच्च न्यायालयातील खटला लवकर चालविण्यासाठी न्यायालयाला विनंती करावी.न्यायालयाचा स्थगिती आदेशापुर्वी एसईबीसी प्रवर्गातील जे शैक्षणिक प्रवेश झाले आहेत या विद्यार्थ्याचे प्रवेश संरक्षित करावेत तसेच या प्रवर्गातील घटकाना व विद्यार्थ्याना ज्या सवलती आहेत त्या सुरु ठेवाव्यात  राज्य लोकसेवा आयोगाने एसईबीसी प्रवर्गाच्या ज्या निवड जाहिर केलेल्या आहेत त्या संरक्षित करण्यात याव्यात ,सारथी संस्थेला आर्थिक निधी व मनुष्यबळ देण्यात यावे यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.संभाजी कर्डिले ,वर्षा काळे ,संजय बारवकर ,प्रा विलास बारवकर ,रुपेश घाडगे, ॲड सागर गायकवाड, शशिकला काळे ,ज्योती हांडे ,संतोष शितोळे,ॲड प्रदिप बारवकर,योगेश महाजन,रमेश दसगुडे,अविनाश जाधव,सुशांत कुटे, अविनाश घोगरे,गणेश खोले आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने  ऋतूजा खोले,  मिताली चव्हाण ,दिप्ती काळे ,साक्षी गायकवाड चार युवतीनी मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार यादव व पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्याकडेे सुपुर्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.