मला आमदार व्हायचंय – दौलत शितोळे

शिरूर विधानसभा मतदारसंघातून पुढील निवडणूक लढवणार

0
शिरूरनामा न्यूज

शिरूर:पुढील पाच वर्ष तालुक्यातील विकासकामांसाठी पुढाकार घेऊन तालुक्याचा कायापालट करण्याचा आपला मानस असून २०२९ ची विधानसभा निवडणूक शिरूर मतदार संघातून लढणार आहे.असे राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौ लत शितोळे यांनी सांगितले.

            शितोळे म्हणाले, माझे गाव शिंदोडी असून  गुनाटहून येणारा रस्ता केवळ माझ्या गावाकडे येणारा असल्याने मागील आमदाराने हा रस्ता होऊ दिला नाही.आता याच रस्त्यासह पूर्व भागातील इतरही
गावांच्या वीस कोटी रुपयांच्या कामाचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देण्यात आला आहे.या प्रस्तावाबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही शितोळे यांनी सांगितले.आमची संघटना महायुतीचा घटक असून राज्यात मला स्टार प्रचारक म्हणून काम करण्याची संधी महायुतीने दिली. आम्ही प्रचार केलेल्या शिरूर हवेली सह राज्यातील बहुतांशी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत याचा आम्हाला आनंद आहे. शिरूर तालुक्याचा विचार करता शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके यांना बरोबर घेऊन एकविचाराने तालुक्याचा कायापालट करण्याचा आमचा मानस असल्याचे शितोळे म्हणाले.यासाठी न्हावरे येथे मुख्यमंत्री सहायता निधी पोर्टल सुरू करण्यात येणार असून या अंतर्गत येणाऱ्या योजनांचा तालुक्यातील जनतेला लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. विविध कामासदर्भात ज्या ज्या गावांचा प्रस्ताव आमच्याकडे येईल त्या त्या गावांचा कामासाठी आमचे संघटना पुढाकार घेऊन मंत्रालय स्तरावर त्याचा पाठपुरावा करणार आहे.पुढील पाच वर्षात महायुतीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन तसेच अठरापगड जातींना बरोबर घेऊन एक विचाराने तालुक्याची सेवा करणार आहोत.असा निर्धार शितोळे यांनी व्यक्त केला.
पुढील विधानसभा निवडणूक लढणार
सध्या शिरूर हवेली असा मतदारसंघ असून शिरोळ तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव मतदार संघाला जोडण्यात आली आहेत तर हवेलीतील गावे या मतदारसंघात समाविष्ट करण्यात आलेले आहेत.२०२९ मध्ये पुन्हा पूर्वीचा शिरूर तालुका मतदारसंघ असणार आहे.जय मल्हार क्रांती संघटना राज्यातील एकमेव शिरूर मतदार संघाची मागणी महायुतीकडे करणार असल्याचे शितोळे यांनी सांगून आपण शिरूर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास देखिल शितोळे यांनी व्यक्त केला.संधी मिळाल्यास माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल करणार असे ते म्हणाले.आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या मागे ताकदीने उभे राहणार असून राज्यात जिथे शक्य आहे तिथे संघटनेचा उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शितोळे म्हणाले.
जय मल्हार क्रांती संघटनेत राज्यात वाढती ताकद
संघटनेची सांगोला येथे वार्षिक सभा पार पडली.यावेळी लिंगायत सेवा संघ,अहिल्यादेवी होळकर विचार मंच, वैदू समाज,नाभिक संघटना यांच्यासह बौद्ध व मातंग संघटना क्रांती संघटनेत विलीन झाल्या.या सर्व समाजाला न्याय देताना त्या त्या संघटनेला संघटनेची पदे बहाल करण्यात आल्याचे शितोळे यांनी यावेळी सांगितले.रामोशी बेडर समाजाची विविध कामे मार्गी लावली.त्याचप्रमाणे इतर समाजाची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असल्याचे शितोळे म्हणाले.
राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे निकष व तरतूद अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रमाणे असावी अशी आपली सरकारकडे मागणी असल्याचे शितोळे यांनी सांगितले.
Leave A Reply

Your email address will not be published.