माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश
येवल्यातील शिवसेना-ठाकरे गटाला धक्का
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
येवला:विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येवल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शिवसेना-ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष तथा आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कल्याणराव पाटील यांच्या प्रवेशामुळे या भागात पक्षाचा पाया आणखी मजबूत होणार आहे. येवला हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे.
छगन भुजबळ यांचे येवला मतदार संघावर प्रभुत्व असून पाटील यांच्या पक्ष प्रवेशामुळे भुजबळ यांना अधिकचा फायदा होणार आहे.