‘महावीर की रोटी’ सामाजिक उपक्रमाच्या वतीने कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नि:शुल्क टिफीन सेवा

तिलोक रत्न आनंद चैरीटेबल ट्रस्ट चा कौतुकास्पद उपक्रम

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क

शिरूर:येथील तिलोकरत्न,आनंद चैरिटेबल ट्रस्ट संचलित ‘महावीर की रोटी’सामाजिक उपक्रमाच्या वतीने शिरूर शहर व पंचक्रोशीतील कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नि:शुल्क टिफीन सेवा सुरू करण्यात आली आहे.

         शहर व पंचक्रोशी मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतानाचे चित्र आहे.अनेक कुटुंबातील सर्व सदस्य कोरोना बाधित आहेत.अशा घरांमध्ये स्वतः स्वयंपाक करणे अडचणीचे झाले असून संपूर्ण कुटुंबच बाधित असल्यामुळे बाहेरील व्यक्ती स्वयंपाक करण्यासाठी तेथे जाऊ शकत नाही.ही बाब,गेली पाच वर्ष अन्नापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून ‘महावीर की रोटी’ सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून कौतुकास्पद काम करणाऱ्या या उपक्रमाच्या सदस्यांच्या निदर्शनास आली. अडचणीत सापडलेल्या अशा घटकांसाठी भोजनाची व्यवस्था व्हावी या उद्देशाने या सदस्यांनी निशुल्क सेवा सुरू केली आहे.जिथे कुटुंबातील सर्व सदस्य कोरोनाबाधित आहेत अथवा जिथे घरात रुग्ण आहेत व रुग्णासह इतर सदस्यांची भोजनाची गैरसोय होत आहे. अशा कुटुंबातील व्यक्तींनी महावीर की रोटी उपक्रमाच्या सदस्यांशी एक दिवस अगोदर सकाळी ११.३० ते १२.३० या वेळेत भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भ्रमणध्वनी क्रमांक खालील प्रमाणे:
सुनील बाफणा-९८५०५६७०१०
धरम कोठारी- ९८२३३३३३५९
प्रितेश कोठारी-९३७०६०६१११

Leave A Reply

Your email address will not be published.