शिरूर:शिरूरच्या महसूल विभागात मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाण घेवाण होत असल्याची तसेच मोठ्या प्रमाणावर एजंटांचा सुळसुळाट झाल्याचे मला समजले आहे.तुम्ही मायबाप जनतेने मला निवडून दिले असल्याने तुम्हाला महसूल विभागाचा त्रास होत असेल तर मी तुमच्यासोबत या विभागाच्या विरोधात त्यांच्या दारात बसेल.असा सज्जड इशारा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी येथे दिला.
शिरूर शहर महविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीने खासदार कोल्हे व खासदार नीलेश लंके यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी खासदार कोल्हे यांना शिरूरनामा च्या खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार? या महसूल विभागाबाबत प्रसिद्ध केलेल्या मालिकेविषयी माहिती देण्यात आली.यावर कोल्हे यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाला आडेहात घेतले.जनतेने महसूल विभागाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हे यांनी ज्या जनतेने निवडून दिले त्या जनतेला महसूल विभागाचा त्रास होत असेल तर जनतेसोबत आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा दिला.खासदार साहेबांनी त्यांचे अधिकार वापरून अधिकाऱ्यांना सरळ केल्यास जनतेला आंदोलनाची वेळच येणार नाही.महसूलचा असा अनुभव कमी अधिक प्रमाणात सर्वत्रच आहे.कोल्हे यांनी संसदेत हा विषय मांडल्यास राज्यातील जनतेची समस्या दूर होऊ शकेल.अशी जनतेची धारणा आहे.आमदार ॲड.अशोक पवार यांनी देखील विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा मांडावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.