शिरूर:नोकरशाहीचा स्वार्थ जागा झाला त्यांची लोकप्रतिनिधींबरोबर अभद्र युती होते.ही युती वाढत चालल्याचे भयानक वास्तव असून मतदार राजाने हे थांबवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी येथे व्यक्त केले.
शिवजयंती निमित्त आयोजित स्व धनराज नहार स्मृति व्याख्यान मालेत ‘लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही: संविधानिक जबाबदाऱ्या आणि वास्तव ‘या विषयावर बोलताना झगडे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. कृषी अर्थतज्ञ दीपक गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंगअण्णा थोरात, रमेश कर्नावट, बाजार समितीचे माजी संचालक विजेंद्र गद्रे,उर्मिला इसवे,शितोळे
आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
झगडे म्हणाले, संविधानाने सक्षम नोकरशाही दिली असून नोकरशाहीला कर्णापेक्षा जास्त भक्कम कवच कुंडल दिले आहे. लोकप्रतिनिधी जरी शासन चालवत असले तरी लोकप्रतिनिधी चुकले त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची व्यवस्था संविधानाने केली आहे. मात्र गेल्या ७० वर्षात नोकरशाहीने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली का? असे विचारल्यास त्याचे उत्तर नाही असेच आहे.देशात भ्रष्टाचार दुर्गती अनुशासनहीनता, बेरोजगारी जी आहे याच्या अयशस्वीतेला नोकरशाहीत जबाबदार आहे. लोकप्रतिनिधी पाच वर्षांनी बदलतात मात्र लोकसेवा आयोगाकडून त्रयस्थपणे नियुक्ती केलेली नोकरशाही कायम असते. त्यामुळे देशात काही वाईट घडत असेल तर त्याला जबाबदार नोकरशाहीच असते.आम्हाला काम करू दिले जात नाही हा नोकरशाहीचा कांगावा व पळपुटेपणा आहे.यात काहीतरी स्वार्थ असतो हा कांगावाखोरपणा प्रचंड वाढला असल्याचे झगडे म्हणाले. हा कांगावा जनतेने समाजमनासमोर आणला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी चुकले तर नोकरशाहीने त्यांना थांबवणे संविधानाला अपेक्षित आहे मात्र तसे घडत नाही.अशी खंत झगडे यांनी व्यक्त केली.हे.आपल्या ३४ वर्षाच्या प्रशासकीय कालावधीत आपण हे सर्व अनुभवल्याचे ते म्हणाले.
एकूणच लोकप्रतिनिधी व नोकरशाहीची अभद्र युती देशासाठी घातक आहे.मतदार राजाने याकडे गांभीर्याने बघण्याची व ती थांबण्याची गरज असल्याचे झगडे म्हणाले.मतदार राजाने ही परिस्थिती समजून घेतली नाही तर पुढे भयावह परिस्थिती निर्माण होण्याची भीती झगडे यांनी व्यक्त केली. त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल ही भाष्य केले ते म्हणाले, आपले दरडोई उत्पन्न गरीब देशांप्रमाणे आहे. साडेतीन ट्रिलियन इकॉनोमी हे फक्त मोठे घर पोपळ वासा अशी परिस्थिती आहे.मोहम्मद हुसेन पटेल यांनी प्रास्ताविक, शहाजी पवार यांनी सूत्रसंचालन तर ॲड. किरण आंबेकर यांनी आभार मानले.बाबाजी गलांडे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.