कुटुंबापेक्षा मतदार संघातील जनतेला शिवाजी दादांनी जास्त वेळ दिला –  माधुरी आढळराव पाटील

0
शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:गेल्या पंधरा वर्षांत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपल्या कुटुंबापेक्षा शिरूर मतदार संघासाठी जास्त वेळ दिला.विकास कामांबरोबरच गोरगरीब,सर्वसामान्यांचं दुःख हलकं करण्याचे मोलाचे काम त्यांनी तडफेने केले.त्यामुळे ते विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास आढळराव पाटील यांच्या स्नुषा माधुरी अक्षय आढळराव पाटील यांनी येथे व्यक्त केला.
         शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ माधुरी पाटील यांनी शहरात पदयात्रा द्वारे मतदारांशी संपर्क साधला.यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त विधान केले.शिवाजीदादा यांनी २००९ मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यानंतर प्रथमच शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवली. या निवडणुकीत मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना विजयी केले. दादांनीही मतदारांच्या विश्वासाला पात्र राहत मतदारसंघाचा समतोल विकास केला. विकास कामांच्या जोरावरच २०१४ मध्येही मतदारांनी दादांना निवडून दिले.त्यानंतरच्या पाच वर्षाच्या कालावधीत पहिल्या पंचवार्षिक पेक्षाही जास्त चांगले काम केले. असे असतानाही २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभव झाला म्हणून खचून न जाता पराभव झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ते घराबाहेर पडले.त्यानंतर सातत्याने ते मतदार संघातील जनतेच्या संपर्कात राहिले.कोरोना कालावधीत त्यांनी संपूर्ण शिरूर लोकसभा मतदार संघात जाऊन स्वनिधी तसेच आमच्या संस्थांच्या माध्यमातून लोकांना विविध प्रकारची मदत केली.लोकं बाहेर फिरायला घाबरत होते.मात्र दादांनी कोरोना कालावधीत स्वतःला जनतेसाठी वाहून घेतले.आम्ही अनेकदा काळजी व्यक्त केली.मात्र तरीही दादांनी आमचे न ऐकता लोकांची सेवा सुरूच ठेवली.विद्यमान खासदार मात्र पाच वर्षांतच काय तर ज्या वेळी जनतेला मदतीची गरज होती त्या कोरोना काळातही मतदार संघात फिरकले नाही.शिवाजी दादांनी खासदार होते तेव्हाही आणि पराभूत झाले तेव्हाही फक्त जनतेचाच विचार केला.आम्हा कुटुंबीयां पेक्षा दादांनी जनतेला जास्त वेळ दिला.अशा व्यक्तीला पुन्हा निवडून देणार की जो पाच वर्षात फिरकलाच नाही त्याला निवडून देणार असा सवाल माधुरी आढळराव पाटील यांनी केला.जनता सुज्ञ आहे.ती दादांना विक्रमी मतांनी निवडून देईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
         राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शरद कालेवार, भाजपचे शहराध्यक्ष नितीन पाचर्णे, शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात, भाजपा अल्पसंख्यांक सेलच्या प्रदेशाध्यक्ष रेश्मा शेख,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मितेश गादिया,नगरसेविका अंजलीताई थोरात,मनीषा कालेवार,ज्योती लोखंडे,भाजपा महिला शहराध्यक्ष प्रिया बिरादार, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष श्रुतिका झांबरे, तज्ञिकाताई कर्डिले, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रंजन झांबरे,अतुल गव्हाणे, तर्डोबावाडीच्या माजी सरपंचव र्षाताई काळे,भाजपचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे,शिवसेना शहर संघटक सुरेश गाडेकर  निलेश नवले सचिन गरुडे रश्मी शिरसागर, रिटा जाधव, विजय नरके,सुदाम चव्हाण,सुयोग चव्हाण,ओमकार ससाणे,ओम शहाणे,भरत जोशी वैभव जोशी,सुजाता पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.