शिरुर: नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. हे कायदे शेतकऱ्यांचे हिताचे असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली जात आहे. असा आरोप संयुक्त किसान मोर्चा चे पदाधिकारी संदीप गिड्डे यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
कृषी कायद्याच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी पुणतांबा येथून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने पोल-खोल यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे शिरूर येथे आगमन झाले असता, शेतकरी प्रतिनिधींनी स्वागत केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गिड्डे बोलत होते. ते म्हणाले, केंद्र शासनाने मंजूर केलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत.असे सरकारला वाटत आहे.सरकार या गोष्टीवर ठाम आहे. यामुळे तसेच एम एस पी सह इतर मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक नसल्याने शेतकरी आंदोलनाची कोंडी अद्याप कायम आहे. मात्र वास्तविक पाहता हे कायदे ना शेतकऱ्यांच्या ना ग्राहकांच्या हिताचे आहेत. या कृषी कायद्याचा संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना फटका बसणार असून दिल्ली सीमेवर सुरू असलेले आंदोलन देशातील आहे असा दावा त्यांनी केला. हे कायदे तसेच शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी पोल-खोल यात्रा काढण्यात आल्याचे गिड्डे यांनी स्पष्ट केले.
लोकशाही क्रांती आघाडी रवींद्र धनक रवींद्र धनक यांनी, हे कृषी कायदे रद्द करून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी.अशी मागणी केली.बाजार समिती येथे पोल-खोल यात्रेचे स्वागत करण्यात आले. किसान मजदूर महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लक्ष्मण वंगे , प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर ,अरुण कान्होरे ,नितीन थोरात,लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष ॲड ओमप्रकाश सतीजा,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,मोहम्मद हुसेन पटेल ,शिवाजीराव खेडकर ,ॲड विक्रम पाचंगे ,खुशाल गाडे ,वसंत बेंद्रे ,डॉ सुभाष गवारी,दिपक गायकवाड ,अजिमभाई सय्यद ,यावेळी उपस्थित होते.२० जानेवारीला नांदेड येथे पोल-खोल यात्रेचा समारोप होणार असल्याचे थोरात यांनी सांगितलेे.