खासदारसाहेब जरा ‘शिरूर’ कडेही लक्ष द्या

शिरूरकरांच्या वतीने शिवसेनेचे आवाहन

0
शिरूरनामा न्यूजनेटवर्क

 

शिरूर: शहर व तालुक्याात कोविड रुग्णांंच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतानाचे चित्र असून बेड मिळत नसल्यानेेे रूग्णांचे हाल होऊ लागले आहेत.खासदार साहेब शिरूरच्या या परिस्थितीकडे जरातरी लक्ष द्या.असे आवाहन शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष,नगरसेवक संजय देशमुुुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरूरच्या खासदारांना केले आहेेे.

         तालुक्यात कोविडच्या रुग्णांनी चारशेचा आकडा पार केला असून शिरूर शहरात रुग्णसंख्येने शंभरी पार केली आहे.शहरात मातोश्री मदनबाई माणिकचंद धारीवाल,श्रीगणेशा व वेदांता ही तीन तर तालुक्यात शिक्रापूर येथील सुर्या व मांडवगण फराटा येथील वरद् विनायक खासगी रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. या रुग्णालयांमध्ये डेलिकेटेड कोरोना आरोग्य सेंटर्स सुरु करण्यात आली आहेत.कोविड रुग्णांच्या संख्येत दररोज भर पडत आहे. यामुळे शहर व तालुक्यात कोविड आरोग्य सेंटर्सची संख्या वाढवण्याची गरज आहे.सद्याची परिस्थिती पाहता रूग्णांना बेड मिळेनासे झालेत.यातच सेंटर्समध्ये व्हेण्टिलेटर्सची संख्या मर्यादित असल्याने व्हेण्टिलेटरची गरज पडणाऱ्या रुग्णांना दाखल करून घेण्यासही मर्यादा आल्या आहेत.अशात रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होऊ लागली आहे. कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सुचनेनुसार सोमवारपासून ग्रामीण रुग्णालयात कोविड आरोग्य सेंटर सुरु केले जाणार आहे.मात्र वाढती रुग्णसंख्या पाहता तालुका व शहरात बेडची व व्हेण्टिलेटर्स संख्या वाढवणे गरजेचे आहे.
       शिरूर तालुक्याच्या या परिस्थितीकडे लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांचे मात्र अजिबात लक्ष नाही.असा आरोप शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष, नगरसेवक संजय देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.देशमुख म्हणाले,निवडून आल्यापासून खासदार शिरूरला फिरकलेच नाहीत.निदान कोविडच्या परिस्थितीत तरी त्यांनी यायला हवे होते.मात्र तरीही ते शिरूरला आले नाहीत.
      ज्या तालुक्याच्या नांवाने लोकसभा मतदार संघाचे नांव आहे.त्या शिरूर तालुक्याला सद्याच्या गंभीर परिस्थितीतही खासदारांनी वाळीत टाकले आहे.फक्त जुन्नर,आंबेगाव व खेड म्हणजे शिरूर मतदारसंघ नाही. शिरूर तालुक्याचाही या मतदारसंघात समावेश असून शहर व तालुक्यातील कोविडच्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच रुग्णांची परवड होऊ नये म्हणून खासदारांनी आतातरी लक्ष द्यावे असे आवाहन देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. हे केवळ आमचे नव्हेतर शिरूरच्या नागरिकांचे आवाहन आहे.असे देशमुख यांनी म्हटले आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील खासदार असताना सर्वांचे कॉल स्विकारायचे. मात्र आताचे खासदार त्यांच्या पक्षाच्या पदाधिका-यांचेही कॉल स्विकारत नाहीत. यामुळे सर्वसामान्यांचे काय होत असेल सांगायला नको.त्यांना निवडून देऊन शिरुरकरांचा भ्रमनिरास झाल्याचा टोला देशमुख यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.