खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार ?भाग ५

0

 

खाबूगिरी आमचा जन्मसिद्ध अधिकार ?भाग ५

शिरूर:मूल्यांकन करणे,खरेदीखत,साठेखत,गहाणखत, हक्कसोड भाडेपट्टे,बक्षीसपत्र,वाटपपत्र,करारनामे, मुद्रांकशुल्क वसूल करून नोंदणी करणे आदी प्रकारची सेवा देणाऱ्या दुय्यम निबंधक कार्यालयात गुंठेवारी कायद्याची पायमल्ली करून वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून खरेदीखत केले जात आहेत.नकला काढण्यासाठी देखील नागरिकांना नाहक भुर्दंड दिला जात आहे.

विभागाचे नाव “दुय्यम”. ‘ अर्थ ‘ पूर्ण कामाला मात्र येथे प्राधान्यक्रम

 विभागाचे नाव “दुय्यम”. ‘ अर्थ ‘ पूर्ण कामाला मात्र येथे प्राधान्यक्रम असल्याचे वास्तव आहे.गुंठेवारी कायद्यानुसार शेतजमिनीची किमान १o गुंठ्याची व त्यावर खरेदीखत केले जाते.( बागायत मर्यादा १० गुंठे,जिरायत मर्यादा २० गुंठे)या कायद्यामुळे एक,दोन अथवा दहाच्या आतील गुंठे असणारी जमिनीची विक्री होत नसल्याने दोन गुंठ्याचे पाच ग्राहक एकत्र आणून दहा गुंठ्याचे खरेदीखत करण्याची पद्धत सध्या सर्रास पहावयास मिळते.(या खरेदीखतासाठी गुंठ्यामागे मोठी रक्कम द्यावी लागते.)या एकत्रित खरेदीमुळे यापैकी एखाद्या ग्राहकास पुढे आपली दोन गुंठे विक्री करायची झाल्यास विक्री होऊ शकत नाही.मात्र दुय्यम निबांधकाचे समाधान केल्यास वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून अशी खरेदीखते करून दिली जातात.’अर्थ’पूर्ण विश्वास दिल्यावर या विभागात सर्वकाही शक्य होते.जिरायत जमिनीसाठी किमान २० गुंठ्यांचे खरेदीखत होते.मात्र अनेकदा या जमिनी बागायत दाखवून(तलाठ्याकडून आकार बदलून) दहा गुंठ्याचे देखील खरेदीखत या विभागाकडून केले जाते.रांजणगाव पंचतारांकित औद्योगिक वसाहत व चासकमान तसेच डिंभे पाणी प्रकल्पांमुळे तालुक्याची आर्थिक प्रगती होत आहे. अशात जमिनींना सोन्याचा भाव आला आहे.यामुळे अनेक शेतकरी शेती व्यवसाय सोडून आपल्या जमिनी गुंठेवारी करून विक्री करण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.दुय्यम निबंधक कार्यालयासाठी ही एक पर्वणीच असून जिथे नियमात बसत नाही तिथे नियमांना फाटा देऊन कामकाज केले जात असल्याचे वास्तव आहे.
शिरूर मध्ये झाले नाही तरी तळेगाव मध्ये काम होते. ?
     .  ..शिरूर तालुक्यात शिरूर तसेच तळेगाव ढमढेरे येथे दुय्यम निबंधक कार्यालय आहेत.या दोन्ही कार्यालयात दररोज मोठ्या प्रमाणावर खरेदीखताचे दस्त तयार होतात.सर्व दस्त कायदेशीरपणे झाल्यास काहीच मिळू शकत नाही.यामुळे वरकमाईसाठी  दोन्ही कार्यालयात कायद्याला बायपास करून चुकीची कामे होत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. तालुक्यात वाढत्या लोकसंख्येमुळे विशेषतः पुणे ते कोरेगाव भीमा या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर हाउसिंग सोसायटी तयार झाल्या आहेत. या सोसायटीमधील फ्लॅटची खरेदीखते करताना काही त्रुटी आढळल्यास त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेऊन खरेदी खते केली जातात.असा अनुभव अनेक नागरिकांनी बोलून दाखविला.
          सर्वप्रकारच्या दस्तनोंदणीच्या नकलांसाठी नाममात्र फी आकारली जाते.मात्र या विभागात नागरिकांची अडवणूक करून जादा पैसे घेतले जातात.नागरिकांना त्यांची गरज असल्याने नागरिक विनातक्रार जादा पैसे मोजतात.या विभागाच्या एकूण कार्यपद्धतीची तपासणी होणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.