शिरूरनामा न्यूज नेटवर्क
शिरूर:गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसून जनतेचा विश्वासघात केला आहे.रेटून खोटे बोलणे, जुमलेबाजी हाच एकमेव या सरकारचा अजेंडा असून जनता त्यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.असा घणाघात शिवसेना शहरप्रमुख संजय देशमुख यांनी केला.
मोदी सरकरच्या फसव्या योजनांचा पोलखोल करण्यासाठी तसेच सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्यासाठी उध्दव ठाकरे शिवसेनेने ‘ होऊ द्या चर्चा ‘ या कार्यक्रमाचे राज्यभर आयोजन केले आहे.या अंतर्गत गाव, वाडी वस्तीवर एलईडी स्क्रीनवर चित्रफीत दाखवली जात आहे.शिरूर शहरात आगमन झाले असता,देशमुख यांनी सरकारवर हल्ला चढविला.देशमुख म्हणाले,मोदी सरकारच्या कामांचा पंचनामा या कार्यक्रमातून केला जात असून जनतेचा यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.सामान्य जनता या सरकारच्या जुमलेबाजीला वैतागली असून त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.शिरूर तालुक्यातील २० गावांमध्ये ‘होऊ द्या चर्चा ‘हा कार्यक्रम पार पडला असल्याचे शिरूर तालुक्याचे संपर्क प्रमुख मनोज इसवे यांनी सांगितले.शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे,तालुका प्रमुख पोपट शेलार यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली.जिल्हा उपप्रमुख मच्छिंद्र गदादे,महादेव कडाळे,खुशाल गाडे,सुनील परदेशी,राजेंद्र चोपडा,शिवाजी मचाले, जालिंदर कुरुंदळे, संतोष पवार,माणिक गव्हाणे,पप्पू गव्हाणे,उमेश जाधव आदी यावेळी उपस्थित होते.