लॉकडाऊन कालावधीत कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणावार कामगार आपापल्या राज्यात परतले.लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर कारखाने सुरु करण्यात आले. मात्र कामगारांच्या कमतरतेमुळे अजुनही कारखाने पुर्ण क्षमतेने सुरु होऊ शकले नाहीत.याचा त्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.आमदार पवार यांनी याची दखल घेत प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसिलदार लैला शेख यांच्या उपस्थितीत आज रांजणगांव औद्योगीक व साहतीतील कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आमदार पवार म्हणाले,संपुर्ण जग कोरोनाच्या संक्रमणाचा सामना करीत आहे.आपला देशही यामुळे प्रभावित झाला आहे.यामुळे देशाला लॉकडाऊनचा सामना करावा लागला आहे. या लॉकडाऊनचा कारखानदारीला मोठा फटका बसला आहे. या कालावधीत कारखाने बंद राहील्याने मोठया प्रमाणावर कामगार आपापल्या राज्यात परतले आहेत. लॉकडाऊन शिथील झाल्याने कारखाने सुरू झाले. मात्र गेलेले कामगार पुन्हा न आल्याने कारखानदारांना कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे.चार कारखान्यातच दिड हजार कामगार कमी झाल्याची माहिती यावेळी आमदार पवार यांनी दिली.
कामगार तुटवड्याची परिस्थीती पाहता, स्थानिकांना काम कसे मिळेल तसेच कमी पडल्यास इतर भागातून कामगार कसे उपलब्ध करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. या व्यतिरिक्त कारखान्यांच्या ज्या समस्या असतील त्यांनी प्रांताधिकाऱ्यांना मेलवर पाठवाव्यात. या संदर्भात पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे आमदार पवार यांनी यावेळी कारखानदारांना आश्वस्त केले.आमदार पवार म्हणाले, कोरोनाचे संक्रमण सुरूच आहे.अशात कारखाना प्रशासनाने कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.सोशल डिस्टन्सींग,सॅनिटायझीग आदी बाबतीत निष्काळजीपणे वागणाऱ्या कामगारांवर वेळ पडल्यास कारवाईही केली पाहिजे.सध्या कारखान्यांमध्ये येणाऱ्या कामगारांची तापमान तपासणी, सॅनिटायझींग केले जाते. या बरोबरच कारखाना प्रशासनाने कामगारांच्या रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर ही यंत्रणाही कार्यान्वित करावी.अशा सुचना यावेळी दिल्या यास उपस्थित अधिकाऱ्यांनी त्वरीत होकार दर्शवला.